इगतपुरीतील ‘त्या’ रेव्ह पार्टीत होती ‘ही’ अभिनेत्री

0

मुंबई: नाशिकमधील इगतपुरीतील दोन खासगी बंगल्यांमध्ये सुरू असलेली रेव्ह पार्टीवर ग्रामीण पोलिसानी छापा मारला आणि धक्कादायक माहिती समोर आले, पोलिसांनी १२ तरुणींसह 22 जणांना अटक केली. एक तरुणी परदेशातील आहे. बारा तरुणींपैकी पाच ते सहा तरुणी हिंदी आणि दाक्षिणात्य सिनेमासृष्टीशी संबंधित आहेत. यातील एकीने मराठी बिग बॉस रिअॅलिटी शोमध्ये सहभाग नोंदवला होता. या अभिनेत्रीचं नाव आता समोर आलं आहे. अभिनेत्री हिना पांचाळ असं तिचं नाव आहे.

पोलिसांनी कोकेन, हुक्का, इतर ड्रग्ज हस्तगत करण्यात आले. इगतपुरी पोलिसांनी गुन्हा दाखल केला. स्काय ताज व्हिला आणि स्काय लगून व्हिला या खासगी बंगल्यांमध्ये रेव्ह पार्टी सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पाटील यांच्यासह पथकाने बंगल्यावर छापा मारला. सर्व संशयित ड्रग्ज घेत असल्याचे समोर आले. त्यांच्याकडून कोकेन, हुक्का व इतर ड्रग्जसह त्यांची वाहनेही जप्त करण्यात आली.

हीना पांचाळ ही मराठी बिग बॉस दुसऱ्या पर्वातील पहिली वाइल्ड कार्ड एंट्री घेतलेली स्पर्धक होती. हिना अभिनेत्री नृत्यांगणा असून ती आयटम साँग साठी प्रसिद्ध आहे. तसंच अटक केलेल्या दोन तरुणी कोरिओग्राफर म्हणून काम करतात. यातील एक कोरिओग्राफर मूळ इराणची असल्याचे पोलिसांच्या तपासात स्पष्ट झाले.

Leave A Reply

Your email address will not be published.