मुंबई ः नुकत्याच होऊन गेलेल्या पदवीधर आणि शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीत महाविकास आघाडीने बाजी मारली. परंतु, येत्या महापालिकेच्या निवडणुकीत काॅंग्रेसनं स्वबळावर लढावं, अशी मागणी जोर धरली जात आहे. ”शिवसेना आपला शब्द पाळत नाही. कोणत्याही निर्यणात सामाविष्ट केले जात नाही. एकहाती निर्णय घेतले जातात”, असा आरोप मुंबई महापालिकेचे गटनेते रवी राजा यांनी केला आहे.
टीव्ही ९ च्या मुलाखतीत त्यांना हा आरोप केला. रवी राजा पुढे म्हणाले की, ”सोनिया गांधी यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवून काॅमन मिनिमम प्रोग्रामची आठवण करून दिली. शिवसेना महापालिकेतही आपला शब्द पाळत नाही. निर्णय प्रक्रियेत सामावून घेत नाही. त्यामुळे पुढील निवडणूक स्वबळावर लढवावी, अशा आम्ही काॅंग्रेसच्या पक्षश्रेष्ठींकडे केली आहे”, अशी माहिती रवी राजा यांनी दिली.
सोनिया गांधी यांनी पाठविलेलं पत्र हे दबावतंत्र नाही, असे शिवसेना खासदार संजय राऊत यांनी सांगितले आहे. संयुक्त पुरोगामी आघाडीतील प्रमुख नेत्या आहेत. महाविकास आघाडीचं सरकार आलं तेव्हा किमान समान कार्यक्रम तयार आला होता. त्यातील काही मुद्दे सोनियांनी पत्राद्वारे मांडले, याचा अर्थ दबावतंत्र असं समजण्याचं कारण नाही