राज्यातील ९० पेक्षा अधिक स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका २०२२ मध्ये होत असून त्यासाठी शिवसेनेने मोर्चेबांधणी सुरू केली आहे. वर्षा निवासस्थानी मंगळवारी मुख्यमंत्री व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी विशेष बैठक आयोजित केली होती. त्याला सुभाष देसाई, एकनाथ शिंदे हे मंत्री, विनायक राऊत आणि अनिल देसाई हे सेक्रेटरी, तसेच शिवसेनेचे बहुतांश खासदार, आमदार, जिल्हा प्रमुख आणि संपर्क प्रमुख असे १०० नेते, पदाधिकारी उपस्थित होते.
अभियानाच्या कालावधीत राज्याच्या सर्व ३६ जिल्ह्यात सेनेचा एक आमदार आणि एक खासदार फिरणार आहे. बुथ बांधणी कितपत झाली आहे, याची ते खातरजमा करतील. अभियानामार्फत महाविकास आघाडी सरकारच्या विकास योजना जनतेपर्यंत पोहोचवा, असे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी या बैठकीत बजावले आहे.
२०२२ मध्ये राज्यातील बहुतांश पंचायत समित्या, जिल्हा परिषदा, नगरपालिका, महानगरपालिका यांच्या निवडणुका आहेत.