धक्कादायक…तरुणीवर सामूहिक बलात्कार; जाळण्याचा प्रयत्न

0

इंदोर : क्लासमधून परतणाऱ्या 18 वर्षांच्या मुलीवर सामुहिक बलात्कार करुन तिला जाळण्याचा प्रयत्न करण्यात आल्याची धक्कादायक घटना मध्य प्रदेशातल्या इंदोरमध्ये घडली आहे.

इंदोर इथल्या पोलिसांच्या सांगण्यानुसार, पीडिता आपला क्लास संपवून घरी परतत होती. रात्री नऊ वाजता तिच्यावर सामूहिक बलात्कार करण्यात आला. आरोपींनी बलात्कार केल्यानंतर पीडितेला चाकूनं मारलं. नंतर रॉकेल टाकलं आणि जाळण्याचा प्रयत्न केला.

मुलीने मदतीसाठी आरडा ओरडा केल्यावर तिथे लोक आल्याने आरोपी पळून गेले. पीडित मुलीवर शहरातील एका हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत. पोलिसांनी एका आरोपीला ताब्यात घेतलं आहे. इतर आरोपींचा शोध युद्धपातळीवर सुरू आहे.

इंदोरच्या भागीरथपुरामध्ये रेल्वे ट्रॅकजवळ दोन मुलांनी आधी पीडितेवर जबरदस्ती केली. त्यानंतर अजून तीन मुलं आली आणि त्यांनी सामूहिक बलात्कार केला. इंदोरच्या पोलिसांनी या याप्रकरणात पीडितेचा जबाब नोंदवून तपास सुरू केला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.