धक्कादायक! सहकाऱ्याकडूनच जीम ट्रेनर तरुणीवर बलात्कार

0

पुणे : पुणे शहरातील चंदनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये जिम ट्रेनर तरुणीवर बलात्कार झाल्याचा प्रकार उघडकीस आलाय. विशेष म्हणजे या तरुणीच्या सहकाऱ्यानेच शीतपेयात गुंगीचे औषध देऊन बेशुद्ध झाल्यानंतर हा बलात्कार केला. खराडी परिसरात असणाऱ्या एका फिटनेस क्लब मध्ये तीन दिवसांपूर्वी हा प्रकार घडला. पीडित तरुणीने दिलेल्या तक्रारीनंतर आरोपी दीपक चौगुले (रा. पिंपरी चिंचवड ) याच्याविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खराडीतील फिटनेस क्लबमध्ये आरोपी दीपक चौगुले आणि पीडित तरूणी ट्रेनर आहेत. तीन दिवसांपुर्वी दीपकने तक्रारदार तरूणीला भुक लागल्याचे सांगून जीममध्ये डबा घेऊन बोलाविले. त्यानंतर दीपकने शितपेयात गुंगीचे औषध मिसळून तरूणीला प्यायला दिले. काही वेळानंतर तरूणीला गुंगी आल्यानंतर त्याने तिच्यावर बलात्कार केला.

त्यानंतर दीपकने तरूणीला शरीर संबंधाचा व्हिडिओ असल्याचे सांगून धमकी दिली. त्याशिवाय घटनेबाबत कोणाला काही बोलल्यास व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी दिली. चंदन नगर पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक किरण औटी करीत आहेत

Leave A Reply

Your email address will not be published.