धक्कादायक…ब्रिटनमध्ये आढळलेल्या लक्षणांचे रुग्ण भारतात सापडले

0
मुंबई :  ब्रिटन मध्ये ज्या प्रकारच्या लक्षणांची कोरोना रुग्ण आढळले आहेत त्याच प्रकारचे भारतात 6 रुग्ण आढळून आले आहेत. यामुळे मोठे भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. यामध्ये 3 बेंगळुरूतील NIMHANS मध्ये, 2 हैदराबादमधील CCMB मध्ये तर एक पुण्यातील NIV मध्ये पॉझिटिव्ह आढळले आहेत.

इंग्लंड आणि ब्रिटनहून आलेल्या प्रवाशांपैकी नागपूर, औरंगाबाद आणि कल्याणमधील प्रत्येकी एक जण कोरोना पॉझिटिव्ह सापडला आहे.

या तिघांचे नमुने पुण्यातील NIV लॅबमध्ये तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. सध्या या तिघांवरही उपचार सुरू आहेत. पुण्याच्या लॅबमधून येणाऱ्या रिपोर्टकडे संपूर्ण भारताचं लक्ष लागलं आहे.

नवीन प्रकारचे लक्षणे असणारे रुग्ण आढल्याने आता मात्र भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. नवं वर्षांच्या स्वागतासाठी सरकारचे आदेश धुडकावून पर्यटकांनी मोठी गर्दी केली आहे. यातच हे रुग्ण सापडल्याने भीती पसरली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.