धक्कादायक…व्हाट्सअपवर ‘डीपी’ फोटो ठेवणे पडले महागात

0

पुणे : एका 40 वर्षीय महिलेच्या व्हाट्सअप वरील फोटोचा दुरुपयोग करून अश्लील फोटो तयार करण्यात आले. आणि त्यानंतर हे फोटो व्हायरल करण्याची धमकी देत या मुलीकडे पैशाची मागणी करण्यात आली. सिंहगड रोड पोलीस स्टेशनच्या हद्दीत हा प्रकार घडला. चाळीस वर्षे महिलेने या प्रकरणी तक्रार दिली असून एका मोबाईल धारका विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी अधिक माहिती अशी की, फिर्यादी यांच्या व्हाट्सअप वर आरोपी व्यक्तीने वारंवार टेक्स्ट मेसेज केले. तसेच त्यांच्या व्हाट्सअप वर फिर्यादी यांचा चेहरा वापरून मॉर्फ केलेला अर्धनग्न अवस्थेतील फोटो पाठवला. फिर्यादीने हा फोटो पाहिला असता आरोपीने लगेच हा फोटो डिलीट केला. त्यानंतर फिर्यादीने हा फोटो परत पाठव असे सांगत तू असे का केले असे विचारणा केली.

त्यावर आरोपीने माझं तुझ्यावर बारिक लक्ष असतं, तुझे संपूर्ण ओपन फोटो व्हिडिओ माझ्याकडे आहेत. ते मी व्हायरल करेल अशी धमकी दिली. हे फोटो व्हिडिओ व्हायरल करायची नसतील तर पैसे द्यावे लागेल अशी मागणी त्याने केली. त्यानंतर फिर्यादीने पोलिसात तक्रार दिली. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.