धक्कादायक… पोटच्या मुलाला सख्ख्या आईनेच संपवले

0

नाशिक : अंगणात खेळताना मृत्यू झालेल्या चिमुकल्याच्या घटनेचा धक्कादायक तपास पुढे आला आहे. सख्ख्या आईनेच प्रियकराच्या मदतीने पोटच्या मुलाचा काटा काढल्याची ह्रदयद्रावक घटना आडगाव परिसरातील साईनगर भागात घडली आहे.

मोहित घनश्याम जाधव (७) या मुलाचा मृत्यू झाल्याची घटना २१ डिसेंबर रोजी घडली होती. याप्रकरणी जिल्हा शासकिय रुग्णालयातून मिळालेल्या माहितीवरुन आडगाव पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती. मुलाचा मृतदेह अंत्यविधीसाठी ताब्यात न घेता जिल्हा रुग्णालयात दाखल करणारी आई संशयित सुलोचना सोमनाथ कुऱ्हाडे व संशयित आरोपी तिचा पती सोमनाथ ऊर्फ योगेश वसंत कुऱ्हाडे (२२,रा.साईनगर, नांदुरनाका) हेदोघेही फरार झाले होते.

याप्रकरणी आडगाव पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक इरफान शेख यांनी गुन्हे शोध पथकाला तातडीने याबाबत तपास करत मयत मुलाच्या संशयित माता-पित्यांचा शोध घेण्याचे आदेश दिले. यानुसार उपनिरिक्षक धैर्यशिल घाडगे, दिलीप शिंदे, दशरथ पागी, सुनील गांगुर्डे आदींनी तपासाला गती देत घटनास्थळी पाहणी करुन पुरावे गोळा केले. घरात मिळालेल्या काही सुगाव्यांवरुन पथकाने कोपरगाव येथून संशयित महिला सुलोचना हिला बेड्या ठोकल्या.

Leave A Reply

Your email address will not be published.