जळगाव : शरमेने मान खाली घालावी असे कृत्य जळगाव मध्ये पोलिसांनी केले आहे. तपासणीच्या नावाखाली महिला वसतीगृहात जाऊन मुलींना कपडे काढून डान्स करायला लावला आहे. या घनटनेमुळं जिल्ह्यातील सामाजिक संस्था न्याय मागत आहेत.
यासंदर्भात सामाजिक संघटनांनी मंगळवारी जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्याकडे तक्रार केली. त्याच बरोबर या घटनेचा व्हिडिओही सादर केला. जिल्हाधिकाऱ्यांनी याची गंभीर दखल घेतली असून तत्काळ चौकशी करण्याचे आश्वासन दिले.
गणेश कॉलनीतील महिला व बालकल्याण विभागामार्फत चालवण्यात येणाऱ्या वसतिगृहात निराधार व अन्याय, अत्याचार झालेल्या महिला व मुलींच्या निवारा-भोजनाची व्यवस्था केली जाते. वसतिगृहात गैरप्रकार घडत असल्याच्या तक्रारी होत्या.
१ मार्च रोजी काही कर्मचाऱ्यांच्या संगनमताने चौकशीच्या नावाखाली बाहेरील लोकांना व पोलिसांना आतमध्ये प्रवेश देऊन अनैतिक कृत्य केले जात असल्याची कैफियत काही मुलींनी मांडली. चौकशीसाठी आलेल्यांची मुलींना कपडे काढून जबरदस्तीने नृत्य करायला भाग पाडले. ज्या मुली चुकीच्या कृत्यांना नकार देतात, त्यांना मारहाण करण्याची धमकी दिली जाते.
या वसतिगृहात ज्यावेळी सामाजीक कार्यकर्ते गेले त्यावेळी त्यांना आत प्रवेश देण्यात आला नाही. मात्र मुलींनी आपल्यावर बेतलेला प्रसंग खिडकीतूनच सांगितला. यावेळी संस्थेच्या कर्मचाऱ्यांकडून सामाजिक कार्यकर्त्यांशी बोलणाऱ्या मुलींना मज्जाव करण्यात आला.