नागपूर : नागपुरात रविवारी संध्याकाळी कारमध्ये गुदमरून तीन मुलांचा मृत्यू झाला. शनिवारी दुपारपासून तिन्ही मुले बेपत्ता होती. तपासात पोलिसांना त्यांचे मृतदेह घरापासून ५० मीटर अंतरावर एका एसयूव्ही कारमध्ये आढळून आले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तौफीक फिरोज खान (4), आलिया फिरोज खान (6) आणि आफरीन इर्शाद खान (6) ही तिघेही फारूक नगर येथील तीन मुले शनिवारी दुपारी खेळण्यासाठी घराबाहेर पडली होती. सायंकाळपर्यंत घरी न परतल्याने पालकांनी पोलिसांशी संपर्क साधून अपहरणाचा गुन्हा दाखल केला.
पाचपोली पोलिस ठाण्याच्या पोलिस कर्मचाऱ्यांनी मुलांची चौकशी सुरू केली. तेव्हा एका हवालदाराच्या नजरेस एक एसयूव्ही घरापासून काही अंतरावर उभी होती. ज्याच्या आत तीन मुले पडलेली आढळली. पोलिसांनी गाडीचा दरवाजा उघडला तेव्हा सर्व मुले मृतावस्थेत होती.
नागपूरचे पोलिस आयुक्त अमितेश कुमार म्हणाले, खेळत असताना मुलांनी कारचा दरवाजा आतून बंद केला. मग तो दरवाजा उघडता आला नाही. उष्णता आणि गुदमरून त्यांचा मृत्यू झाला. अधिकाऱ्याने सांगितले की, तौफिक आणि आलिया भावंडे आहेत, तर आफरीन शेजारी राहत होती.