काही जण गांजा पिऊन अग्रलेख लिहतात : शेलार

0

मुंबई : सामनाचा अग्रलेख लिहिणाऱ्या माणसाची तुलना मी गांजा आणि चिलीम ओढणाऱ्या माणसासोबतच करेन, असा हल्लाबोल भाजप नेते आशिष शेलार यांनी संजय राऊत यांच्यावर केला आहे. ठाकरेसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनाच्या आजच्या अग्रलेखात ‘अमृत काळात रोज विषाचे फवारे उडताना दिसत आहे’, अशाप्रकारची टीका करण्यात आली आहे. शेलार यांनी याला उत्तर दिले आहे.

आशिष शेलार म्हणाले, काँग्रेस आक्रमक होण्याचा मुद्दा काय, एका समाजाचा अपमान करायचा त्यांना तुच्छ लेखायचे. हा समाज कोर्टात गेला. कोर्टाने शिक्षा सुनावली. आणि काँग्रेस गुन्हेगारासाठी आंदोलन करत आहे.

आशिष शेलार म्हणाले, ज्या बौद्धिक पातळीवरून सामनाचे अग्रलेख येत आहेत. अशा प्रकारच्या अग्रलेखांबद्दल बोलताना लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी सांगितले होते की, गांजा किंवा चिलीम ओढलेला माणूस किंवा वेड लागलेला माणूस अशा पद्धतीने लिहू शकतो.

सभागृहात ज्यांनी मोदींजी विरोधात गलिच्छ घोषणा दिल्या, विधानसभेच्या आवारात मुख्यमंत्र्यांविरोधात खोके खोके अशा घोषणा दिल्या, त्यांच्यावरही कारवाई व्हायला हवी, अशी मागणी आशिष शेलार यांनी यावेळी केली.

राहुल गांधी यांची खासदारकी रद्द करण्याचा भ्याडपणा मोदी सरकारने दाखविला आहे. चोरांना चोर म्हटले, हा काय गुन्हा झाला?, असा सवाल ठाकरे गटाने केला आहे. ठाकरे गटाचे मुखपत्र असलेल्या सामनाच्या अग्रलेखातून मोदी सरकारवर टीका करण्यात आली आहे. यात म्हटले आहे की, पंतप्रधानांनी ज्या ‘अमृतकाला’चा उल्लेख केला त्या अमृतकालात रोज विषाचे फवारे उडत आहेत. न्यायालये, स्वातंत्र्य व लोकशाहीची मानहानी सुरू आहे. मोदीकाल हा अमृतकाल नसून हुकूमशाहीचा आतंककाल वाटावा अशी स्थिती आहे.

अग्रलेखात म्हटले आहे की, ‘गौतम अदानी व मोदी भाई भाई, देश लुट कर खाई मलई’ अशा घोषणा सध्या संसदेत दणाणत आहेत व दोन आठवड्यांपासून संसद बंद पडली आहे. देश लुटणाऱ्या अदानीवर कारवाईचे नाव नाही, पण चोरांना चोर म्हटल्याबद्दल राहुल गांधी यांच्यावर न्यायालयाच्या खांद्यावरून सत्ताधारी पक्षाने गोळी झाडली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.