पुणे : गेल्या महिन्यात दडी मारलेला मान्सून आता राज्यातील अनेक भागात बरसू लागला आहे. त्यामुळे नागरिकांमधील चिंतेचे वातावरण आता कमी होऊ लागले आहे. त्याशिवाय शेतकरीही सुखावला आहे. गेल्या 24 तासात मान्सूने मुंबई, पुणे, पिंपरी चिंचवड, लोणावळा येथे चांगली हजेरी लावली आहे.
लोणावळा शहरात गेल्या 24 तासात 166 मि.मी. इतकी पावसाची नोंद झाली आहे. यंदाच्या हंगामातील हा सर्वाधिक पाऊस आहे. रायगड, रत्नागिरी, पालघर, ठाणे, मुंबई, कोकण, सांगली, सातारा, या भागात जोरदार पाऊस सुरु आहे.त्यामुळे त्याचे पडसाद घाटमाथ्यावरील लोणावळ्यात पाहायला मिळाले. मंगळवारी दिवसभर लोणावळ्यात जोरदार पाऊस झाला.
यंदाच्या वर्षी आजपर्यंत 581 मि.मी.पाऊस झाला आहे. आज देखील पावसाची संततधार सुरु आहे.हवामान विभागाच्या अंदाजानुसार पुढील काही दिवस जोरदार पावसाची शक्याता आहे.7 व 8 जुलै रोजी अतिवृष्टीचा अंदाज असल्याने नागरिकांनी काळजी घ्यावी. त्याशिवाय प्रशासनाने सखल भागात फार पाणी साचणार नाही याची दक्षता घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
दरम्यान, गुजरात ते महाराष्ट्राची किनारपट्टी आणि पूर्व राजस्थानपासून मध्य प्रदेशपर्यंतच्या भागात दोन कमी दाबाचे पट्टे तयार झाले आहेत. त्यामुळे कोकणासह कोल्हापूर, सातारा या भागात अतिमुसळधार पाऊस पडणार असून मराठवाडा, विदर्भ, मध्य महाराष्ट्र येथे 6 ते 8 जुलै हे तीन दिवस मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.
रेट अलर्ट – पालघर (8 जुलै), रायगड (6 ते 8 जुलै), रत्नागिरी (6 ते 8 जुलै), कोल्हापूर (6 ते 8 जुलै), सातारा (6 ते 8 जुलै) ऑरेंज अलर्ट – पालघर (6 ते 9 जुलै), ठाणे (6 ते 9 जुलै), मुंबई (6 ते 9 जुलै),
आरेंज अलर्ट – पालघर (6 ते 9 जुलै),ठाणे (6 ते 9 जुलै), मुंबई (6 ते 9 जुलै),रायगड (9जुलै), सिंधुदुर्ग (6 ते 9 जुलै), नाशिक (6 ते 9 जुलै),पुणे (6 ते 9 जुलै),कोल्हापूर (9जुलै), सातारा (9जुलै)
पुण्याला पाणीपुरवठा करणार्या खडकवासला धरण साखळीतील गेल्या 24 तासांतील पाऊस
खडकवासला 18 मिमी, पानशेत 68 मिमी, वरसगाव 70 मिमी, टेमघर 65 मिमी : एकत्रित पाणीसाठा 3.67 टीएमसी