कार्यालयात तलाठ्याची गळफास घेऊन आत्महत्या

0

बुलडाणा : एका तलाठ्याने तहसील कार्यालयाच्या स्वच्छतागृहातच गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. बुलढाणा जिल्ह्यातील नांदूरा तहसील कार्यालयात गुरुवारी (दि. 15) सकाळी ही धक्कादायक घटना उघडकीस आली.

अनिल अंभोरे असे आत्महत्या केलेल्या तलाठ्याचे नाव आहे. अंभोरे हे नांदुरा तहसील कार्यालयातच कार्यरत होते. गेल्या एका वर्षापासून ते आपली कार्यालयीन कामेसुद्धा करत नव्हते. अनेक शेतकऱ्यांच्या अशा तक्रारी होत्या. पण लोकांच्या तक्रारीकडे दुर्लक्ष केले जात होते, अशी माहिती समोर येत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अंभोरे यांनी गुरुवारी सकाळी नेहमीप्रमाणे ऑफिसला जाण्यासाठी घराबाहेर पडले होते. रस्त्यात एका वाहनचालकाला त्यांनी थांबवले. त्याला चाकूचा धाक दाखवला. मला नांदुरा तहसील कार्यालयात सोड, असे त्यांनी वाहनचालकाला सांगितले. चालकाने त्यांना तहसील कार्यालयाच्या प्रवेशद्वारापर्यंत सोडले. दरम्यान सकाळची वेळ असल्याने कार्यालय परिसरात गर्दी नव्हती. सफाई कर्मचारी सफाईच्या कामात व्यस्त होते. दरम्यान अंभोरे यांनी तहलीसदाराच्या मुख्य केबिनमध्ये प्रवेश केला. त्यांनी केबिनमधील बाथरूममध्ये जाऊन खिडकीला दोरी बांधून गळफास घेतला. घटनेची माहिती मिळताच त्यांची पत्नी मंगलाबाई, दोन्ही मुलांनी तहसील कार्यालयात धाव घेतली. पोलीसही घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. त्यानंतर मृतदेह विच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आला.

Leave A Reply

Your email address will not be published.