दोन मुलींसह वडिलांची गळफास घेऊन आत्महत्या

0

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यात धक्कादायक घटना घडली आहे. पोगत्यानहटी (ता. चिकोडी) येथे पित्याने दोन मुलींसह गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली. आत्महत्येचे कारण समजू शकले नाही.

काडाप्पा रंगापुरे (50), कीर्ती रंगापुरे (18) व स्फूर्ती रंगापुरे (20) अशी त्यांची नावे आहेत. सदर घटना रविवारी सकाळी उघडकीस आली. पोगत्यानहटी येथील काडाप्पा रंगापुरे यांच्या पत्नी चन्‍नावा रंगापुरे (40) यांचेे गेल्या आठवड्यात हृदयविकाराने निधन झाले होते. त्यामुुुळे घरातील सर्वांनाच धक्‍का बसला होता. त्यांची मानसिक स्थिती खालावली होती.

शनिवारी रात्री काडाप्पा रंगापुरे व दोन मुलींनी घरात गळफास लावून घेऊन आत्महत्या केली. रविवारी सकाळी घटना उघडकीस आले.

Leave A Reply

Your email address will not be published.