शेतकरी दाम्पत्याची आत्महत्या

0

जालना : कुटुंबावर आलेले आर्थिक संकट व कर्जबाजारीपणामुळे शेतकरी पती-पत्नीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना जालना जिल्ह्यातील वडीकाळ्या (ता. अंबड) येथे शनिवारी सकाळी सात वाजेदरम्यान घडली. संजय भाऊराव ढेबे (४५), पत्नी संगीता (४०) अशी आत्महत्याग्रस्तांची नावे आहेत.

अंबड तालुक्यातील वडीकाळ्या येथील संजय ढेबे हे अल्पभूधारक शेतकरी असून शेतीकाम तसेच इतर कामे करून घरसंसार चालवत होते. दरम्यान, मागील वर्षी पावसामुळे उभी पिके हातून गेली. या वर्षीही शेतीला खर्च लागला. यामुळे कर्ज वाढतच गेले. त्यांनी एका खासगी फायनान्स कंपनीकडून तसेच बचत गटाकडूनही कर्ज घेतले हाेते.

मागील आठ दिवसांपासून ही रक्कम भरण्यासाठी तडजोड करत होते. मात्र, पैसे न मिळाल्याने या पती-पत्नीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे नातेवाइकांनी सांगितले. प्राथमिक आरोग्य केंद्र सुखापुरी येथे शवविच्छेदन करण्यात आले. संजय ढेबे यांच्या पश्चात आई, वडील, भाऊ, मुलगा, मुलगी, सून, जावई असा परिवार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.