पिंपरी : फसवणुकीच्या गुन्ह्याचा तपास करण्यासाठी आलेल्या बिहार पोलीस दलातील महिला पोलीस शिपाई कविता कुमारी यांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. कविता कुमारी यांच्या आत्महत्येचे कारण अद्याप समजू शकले नाही. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.
महिला पोलीस शिपाई कविता कुमारी (25) या बिहार पोलीस दलातील मुजफ्फरपुर पोलीस ठाण्यात कार्यरत होत्या. पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या आयपीसी 420, 406, 34 मधील आरोपीचा तपास करण्यासाठी पुण्यात आल्या होत्या.
त्यांनी आज (गुरुवार) दुपारी दीडच्या सुमारास बावधन येथील चांदणी चौकातील हॉटेल विवा इन मध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली.
कविता कुमारी या विवाहित असून त्यांच्या आत्महत्येचे कारण अद्याप समजले नसल्याचे पोलिसांनी सांगितले. घटनेची माहिती पोलीस उपनिरीक्षक ओम प्रकाश प्रसाद यांनी दिली आहे.