सनी देओल करोना पाॅझिटिव्ह 

0

मुंबई ः बाॅलिवूड अभिनेता सनी देओल यांची करोना चाचणी पाॅझिटिव्ह आली आहे. ताप आणि सर्दी झाली होती, त्यांनी करोना चाचणी करून घेतली तर, मंगळवारी चाचणी पाॅझिटिव्ह आली. सनी देओल मागील महिनाभरापासून हिमाचल प्रदेशच्या मनालीमध्ये राहत आहेत. त्यांच्या खांद्याची नुकतीच सर्जरी झालेली होती, तेव्हापासून ते मनालीमध्ये आपल्या फार्महाऊसवर आरामासाठी गेले होते.

https://twitter.com/iamsunnydeol/status/1333960736729493504

सनी देओल यांना करोना संसर्ग झाला असल्याची माहिती त्यांचे डाॅक्टर देवेंद्र शर्मा यांनी दिलेली आहे. मनाली सनी देओल यांनी पाहिल्यापासून आवडते. ते बहुतेकवेळी थंडीमध्ये मनालीमध्ये जाऊ राहतात. मुंबईत वाढणाऱ्या करोना संसर्गामुळे ते मनालीमध्ये गेले होते. ३ डिसेंबरला ते पुरत येणार होते, मात्र तोपर्यंत त्यांना करोना संसर्ग झाला.

सनी देओल यांनी स्वतःला विलगीकरणात ठेवलेले आहे. त्यांनी करोना संसर्ग झाल्याची माहिती ट्विचद्वारे आपल्या चाहत्यांनी दिली आणि माझ्या संपर्कात आलेल्या लोकांना स्वतःला विलगीकरण करुन घेतलेले बरे किंवा करोना चाचणी करून घ्यावी. सना देओल लोकसभाचे भाजपाचे खासदार आहेत. त्यांचे दोन चित्रपट येणार आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.