सुप्रिया सुळेचा मोठा दावा, म्हणाल्या – ’15 दिवसांत दिल्ली आणि राज्यात दोन राजकीय भूकंप

0

मुंबई : महाराष्ट्रात राजकीय चर्चांना उधाण आलं आहे. राष्ट्रवादीचे नेते अजित पवार भाजपमध्ये जाण्याच्या मार्गावर असल्याच्या चर्चाहोत आहेत. याच दरम्यान राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी मोठा दावा केला आहे. येत्या 15 दिवसांत दोन राजकीय स्फोटहोणार असल्याचा दावा त्यांनी केला आहे. एक स्फोट दिल्लीत आणि दुसरा महाराष्ट्रात होईल असे सुप्रिया सुळे यांनी सांगितले. एकाहिंदी वृत्तवाहीनीने वृत्त दिले आहे. सुप्रिया सुळे यांच्या या दाव्यानंतर महाराष्ट्रात राजकीय भूकंपाचे अंदाज वर्तवले जात आहे.

सुप्रिया सुळेंना जेव्हा हे विचारण्यात आलं की अजित पवार कुठे आहेत? तेव्हा त्या म्हणाल्या, तुम्ही त्यांच्या मागे जा, तुम्हाला समजेल तेकुठे आहेत. अनेक समस्या आहेत, राज्यात कामं होत नाहीत त्यामुळे काही कार्यक्रम रद्द करुन अजित पवार गेले होते. एक कार्य़क्रम रद्दकेला म्हणून काहीही होत नाही, असेही सुप्रिया सुळे म्हणाल्या.

अजित पवार भाजपमध्ये जाणार का? असे विचारले असता सुप्रिया सुळे म्हणाल्या, माझ्याकडे गॉसिपसाठी वेळ नाही. एकलोकप्रतिनिधी म्हणून माझ्याकडे खूप काम आहे. मला याविषयीची काहीही माहिती नाही. अजितदादा हे मेहनत करणारे आहेत. त्यामुळेत्यांच्या विषयी चर्चा होत आहेत असंही त्या म्हणाल्या. सुप्रिया सुळे यांनी यावेळी अजित पवार नाराज नसल्याचे सांगितले.


संभाजी नगरमध्ये महाविकास आघाडीची सभा झाली. त्या ठिकाणी जयंत पाटील यांनी भाषण केले नाही. याचा अर्थ ते नाराज आहेतअसा होत नाही. नागपूरमध्ये झालेल्या सभेत राष्ट्रवादीच्या दोन नेत्यांची भाषण झाली. त्याठिकाणी अजित पवार बोलले नाहीत, असंहीसुप्रिया सुळे यांनी सांगितलं.

Leave A Reply

Your email address will not be published.