भाजपच्या निलंबित नेत्या सीमा पात्रा यांना अटक

0

रांची : 8 वर्षे मोलकरणीचा छळ करणाऱ्या निवृत्त आयएएसच्या पत्नी आणि भाजपच्या निलंबित नेत्या सीमा पात्रा यांना रांची पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांनी त्यांना अटक करण्यापूर्वी त्या अटकेच्या भीतीने पळून जाण्याचा प्रयत्न करत होत्या. गेल्या दोन दिवसांपासून पोलीस त्यांचा शोध घेत होते. त्यांना आज न्यायालयात हजर केले जाणार आहे.

निवृत्त आयएएस महेश्वर पात्रा यांच्या पत्नीने घरातील कामाच्या बहाण्याने 29 वर्षीय आदिवासी अपंग मुलीला 8 वर्षे घरात डांबून ठेवले. सुनीता असे पीडितेचे नाव आहे. तिला पुरेसे अन्न दिले जात नसल्याचे तिने सांगितले. तिला रॉडने मारहाण करून गरम तव्याने चटके देण्यात आले होते. सध्या तिची कैदेतून सुटका करून रांची RIMS मध्ये दाखल करण्यात आले आहे.

सीमा पात्रा प्रकरणाची दखल घेत राज्यपाल रमेश बैस यांनी नाराजी व्यक्त केली आहे. पोलिसांच्या हलगर्जीपणाबद्दल तीव्र चिंता व्यक्त करत त्यांनी राज्याच्या पोलिस महासंचालकांना पोलिसांनी अद्याप दोषीवर कारवाई का केली नाही, असा सवाल केला आहे.

पात्रा दाम्पत्य रांचीच्या व्हीआयपी क्षेत्र अशोक नगरमध्ये राहते. पीडित सुनीताने सांगितले की, ती गुमला येथील रहिवासी आहे. सीमा पात्रा यांना दोन मुले आहेत. मुलीला दिल्लीत नोकरी लागल्यावर ती 10 वर्षांपूर्वी घरच्या कामासाठी दिल्लीला गेली. ती 6 वर्षांपूर्वी रांचीला परत आली. तिचा सुरुवातीपासूनच छळ होत होता. तिला नोकरी सोडायची होती, पण तिला 8 वर्षे घरात डांबून ठेवण्यात आले. तिने घरी जाण्याचे नाव काढले की तिला बेदम मारहाण करण्यात येई. ती आजारी असताना तिच्यावर नीट उपचारही झाले नाहीत.

Leave A Reply

Your email address will not be published.