सण-उत्सव काळात महिला सुरक्षेबाबत उपाययोजना करा : महेश लांडगे

0

पिंपरी : पिंपरी-चिंचवडमधील सर्वसामान्य नागरिकमहिलांच्या सुरक्षेबाबत पोलीस प्रशासनाने कडक पाऊले उचलावित. सण- उत्सव काळातील कायदा- सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी ठोस उपाययोजना कराव्यात  अशी मागणी भाजप शहराध्यक्षआमदार महेश लांडगे यांनी पोलिसांकडे केली आहे.

याबाबत पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांना निवेदन दिले आहे. त्यामध्ये म्हटले आहे की, पिंपरी-चिंचवड शहरातील लोकसंख्या सुमारे 27 लाख इतकी आहे. त्यामुळे पोलीस प्रशासनाला शहरातील कायदा आणि सुव्यवस्था अबाधीत राखण्यासाठी कायम सतर्क रहावे लागते, ही वस्तुस्थिती आहे. गेल्या दोन वर्षांत कोविड महामारीमुळे सार्वजनिक सण-उत्सव साजरे झाले नाही. मात्र, यंदा सर्व सण-उत्सव निर्बंधमुक्त साजरे होत आहेत. गणेशोत्सवानंतर आता नवरात्रोत्सव, दसरा, दिवाळी असे उत्सव होणार आहेत. परिणामी, प्रमुख बाजारपेठा, वर्दळीचे चौक, सार्वजनिक कार्यक्रमांची ठिकाणांवर महिलांसह अबालवृद्धांची मोठी गर्दी असते. त्यादृष्टीने सुरक्षेबाबत उपाययोजना करण्याची आश्यकता आहे.

सध्यस्थितीला गुन्हेगारी प्रवृत्ती दिवसेंदिवस वाढत चालली असून, महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. सोनसाखळी चोरी, छेडछाडीचे प्रकारही वाढले आहेत. त्यामुळे पोलीस प्रशासनाकडून नवरात्रोत्सवासह सण- उत्सावाच्या काळात गर्दीच्या ठिकाणी महिला पोलीस, अधिकारी यांची गस्त वाढवणे अपेक्षीत आहे. मोक्याच्या ठिकाणी सीसीटीव्हीच्या माध्यमातून चुकीच्या कृत्यांवर ‘वॉच’ठेवला पाहिजे. त्यासाठी नियंत्रण कक्षाचीही स्थापना करण्याची आवश्यकता आहे, असेही आमदार लांडगे म्हटले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.