तमिळनाडू : तामिळनाडूतील एका पोलिस कॉन्स्टेबलला मेहुणीला बागेत किस करणे महागात पडले आहे. आपल्या मेहुणीला घेऊन तो बागेत बसला असता त्याने तिला बाहुपाशात घेत किस केले. तेथे उपस्थित असलेल्या काही तरुणांनी आपल्या मोबाइलमध्ये हा क्षण रेकॉर्ड केला आणि तो व्हायरल केला. वर्दीत असताना त्याने हे कृत्य केल्याने त्याला पोलिस दलातून निलंबित करण्यात आले आहे.
तमिळनाडूतील कोइंबतूर शहरात बालाजी हा सी.आर.पी.एफमध्ये पोलिस हवालदार आहे. तो आपल्या पत्नी व दोन मुलांसह पोलिस निवासात राहतो. त्याच्या बायकोच्या नात्यातील मुलीशी त्याची ओळख झाली. ही मुलगी नात्याने त्याला मेहुणी लागते. कालांतराने ओळखीचे रुपांतर प्रेमात झाले. ते अनेकदा चोरून भेटत होते. एक दिवस तो एका पार्कमध्ये तिच्यासोबत बसला असता त्याने तिला बाहुपाशात घेत किस केले. तिनेही अनेकदा त्याला किस केले.
व्ही. बालाजी असे या पोलिस हवालदाराचे नाव असून, तो मुळचा कुड्डालोर येथील आहे. २०१७ मध्ये सीआरपीएफमध्ये भरती झाला आहे. तो शुक्रवारी सायंकाळी गर्लफ्रेंडसोबत वलंकुलम बांध पार्कमध्ये बसला होता. गप्पा रंगात आल्या असतान त्याने तिला किस केले. हा क्षण तेथील काही तरुणांनी आपल्या मोबाइलमध्ये कैद केला. त्यानंतर या तरुणांनी हा व्हिडिओ कोइंबतूर येथील पोलिस अधिकाऱ्यांना पाठवून ‘पोलिसाच्या वेशात गैरकृत्य’ सुरू असल्याची तक्रार केली. त्यानंतर हा व्हिडिओ सोशल मीडियातही व्हायरल झाला. त्यानंतर एकच चर्चा झाली.