शिक्षक पात्रता घोटाळा : गैरप्रकारामध्ये समाविष्ट उमेदवारांच्या नियुक्त्या रद्द करण्याचे आदेश

0

मुंबई : शिक्षक पात्रता परीक्षा २०१९ मध्ये महाराष्ट्रातला सर्वात मोठा गैरव्यवहार झाल्याचं पुढे आलंय. याबाबत १६ जाने. २०२१ ला पुणे सायबर पोलीस स्टेशनला फौजदारी गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र आज महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने एक ४८० पानी पत्रक जाहीर केलं आहे. विशेष म्हणजे यात परिषदेने गैरव्यवहार करणाऱ्या ७८८० उमेदवारांची यादीच जाहीर केली आहे.

शिक्षक पात्रता परीक्षा २०१९ (१९ जाने. २०२०) च्या परीक्षेमध्ये झालेल्या गैरप्रकारामुळे दाखल गुन्ह्याच्या अनुषंगाने गैरप्रकारामध्ये समाविष्ट उमेदवारांच्या जर नियुक्त्या झाल्या असतील तर त्यांची सेवा तात्काळ संपविण्यात यावी. आणि याची नोंद नियुक्त्या झालेल्या विभागांनी घ्यावी असे आदेश या पत्रकात देण्यात आले आहेत.

सायबर पोलिसात गुन्हा दाखल झाल्यानंतर परीक्षार्थीच्या उत्तरपत्रिकांची कसून तपासणी केली असता त्यात असं निष्पन्न की ७८८० उमेदवार परीक्षेत गैरप्रकारात सामिल असल्याचं दिसून आले. म्हणजे प्रत्यक्षात ते असतांना त्यांनी गैरप्रकार करून स्वतःस पात्र करून घेतलेलं आहे. शिक्षक पात्रता परीक्षा २०१९ चा अंतिम निकाल २८ ऑगस्ट २०२० ला परीक्षा परिषदेच्या स्थळावर प्रसिध्द करण्यात आला होता. त्यानुसार एकूण १६७०५ उमेदवार पात्र ठरले होते. त्यापैकी ७८८० उमेदवार गैरप्रकारामध्ये समाविष्ट असल्याचं निष्पन्न झालंआहे. २९३ उमेदवारांनी आरोपीसोबत बनावट प्रमाणपत्र प्राप्त करून घेतलं आहे. तर उर्वरीत ८७ उमेदवार हे आरोपींच्या संपर्कात आढळून आलेले आहे.

तेव्हा परीक्षा दिलेल्या या उमेदवारांना आता कधीही परीक्षा देता येणार नाही. ज्या उमेदवारांनी परीक्षा दिली होती. त्यांची परीक्षा रद्द करण्यात आली आहे. ज्यांच्या नियुक्त्या झाल्या आहेत त्यांच्या नियुक्त्या रद्द करण्यात येतील.

Leave A Reply

Your email address will not be published.