नाशिक : ठेंगोडा येथे अल्पवयीन मुलाने सोशल मीडियावर औरंगजेबाचा उल्लेख करत इतर धर्मीयांच्या भावना दुखावतील असा मजकूर व्हायरल केल्याने संतप्त जमावाने मुलाचे गॅरेज पेटवून देण्याचा प्रयत्न केला.
ग्रामस्थांनी गुरुवारी गाव बंद आंदोलन करत घटनेचा निषेध केला. शांतता समिती व पोलिसांच्या मध्यस्थीनंतर जमाव शांत झाला. दरम्यान, पोलिसांनी संशयितावर गुन्हा दाखल करत त्याला ताब्यात घेऊन नाशिक येथील बालसुधारगृहात रवानगी करण्यात आली आहे.
यापूर्वी कोल्हापूर आणि अहमदनगर जिल्ह्यातही सोशल मीडियावर औरंगजेबाची पोस्ट ठेवल्यावरून तणाव निर्माण झाला होता.
वादग्रस्त पोस्ट व्हायरल झाल्यानंतर अनेक गावांतील व पंचक्रोशीतील तरुण बुधवारी रात्री दहा ते अकरा वाजेदरम्यान गावात दाखल झाले. घोषणा देत संतप्त जमावाने संशयित मुलाचे गॅरेज पेटवण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर पोलिसांनी जमावाला शांत केले.