जम्मू काश्मीर : जम्मू-काश्मीरच्या राजौरीमध्ये रविवारी झालेल्या गोळीबारानंतर आज सोमवारी सकाळी पहाटे पुन्हा आयईडी स्फोट झाला आहे. राजौरीतील धांगरीत झालेल्या स्फोटात 2 जण जखमी झाल्याचे वृत्त आहे. रविवारी याच गावात दहशतवाद्यांनी तीन घरांवर अंदाधुंद गोळीबार केला होता. या हल्ल्यात 4 हिंदू लोक मारले गेले होते. सोमवारी सकाळी या हल्ल्याचा निषेध करत असतानाच आणखी एका स्फोट करण्यात आला.
स्थानिकांनी सांगितले की, रविवारी सायंकाळी दहशतवाद्यांनी लोकांना घराबाहेर बोलावले. त्यांचे आधार कार्ड पाहिले आणि नंतर गोळीबार सुरू केला. ADGP मुकेश सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार शोध मोहीम सुरू आहे. पोलीस, सीआरपीएफ, लष्कराच्या जवानांनी संपूर्ण परिसराची नाकेबंदी केली आहे.
राजौरीच्या डांगरी भागात दहशतवाद्यांनी रविवारी सायंकाळी 6-7 वाजेच्या सुमारास गावातील लोकांवर अंदाधुंद गोळीबार केला. यामध्ये तीन ग्रामस्थांचा मृत्यू झाला असून 7 जण जखमी झाले. त्यापैकी एकाची प्रकृती चिंताजनक आहे. राजौरी येथील असोसिएटेड हॉस्पिटलचे वैद्यकीय अधिकारी डॉ. मेहमूद यांनी माहिती दिली. ते म्हणाले की, राजौरीतील डांगरी भागात झालेल्या गोळीबारात तीघांचा जणांचा मृत्यू झाला आहे. जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मात्र, स्थानिक सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या घटनेत 4 जणांचा मृत्यू झाला आहे, तर सुमारे 9 जण जखमी आहेत.