बोलेरो कार खोल दरीत कोसळली; नऊ जणांचा मृत्यू

0

नवी दिल्ली : हिमाचल प्रदेशातील सिरमौर जिल्ह्यात भीषण दुर्घटना घडल्याचं समोर आलं आहे. एक बोलेरो कार खोल दरीत कोसळली आहे. या दुर्घटनेत या वाहनातून प्रवास करणाऱ्या नऊ जणांचा मृत्यू झाला आहे. हे सर्वजण एका लग्नासाठी निघाले होते.

या दुर्घटनेची माहिती मिळताच प्रशासन आणि पोलिसांची टीम घटनास्थळी दाखल झाली. त्यानंतर या वाहनातील सर्व नऊ जणांचे मृतदेह दरीतून बाहेर काढण्यात आले आहेत.

ही दुर्घटना कशामुळे घडली हे अद्याप कळू शकलेलं नाही. पोलिसांकडून अद्यापही शोध मोहिम सुरुच आहे. या वाहनामधून किती लोक प्रवास करत होते हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. अद्याप मृतांची ओळख पटलेली नाही, अशी माहिती डीएसपी वीर बहादुर यांनी दिली.

Leave A Reply

Your email address will not be published.