पसरणी घाटात बस उलटली; चाकणच्या कंपनीतील कामगार जखमी

0

सातारा : कंपनीची वार्षिक सहल करुन घरी परत जात असताना बस उलटल्याने 15 जण जखमी झाले. हा अपघात महाबळेश्वर येथील पसरणी घाटात घडला. चालकाच्या प्रसंगावधानामुळे नववर्षांच्या पूर्व संध्येला मोठी दुर्घटना टळली. जखमी झालेले सर्व जण चाकण, पुणे येथील एका कंपनीतील कामगार आहेत.

चाकण येथील सुप्रजित इंजिनिअरिंग कंपनीच्या कर्मचाऱ्यांची वार्षिक सहल प्रतापगड महाबळेश्वरला खाजगी बसने चालले होते. या बसमध्ये एकूण 34 प्रवासी होते. 31 डिसेंबरला सायंकाळी पावणेसातच्या दरम्यान परतीच्या प्रवासाला असताना पाचगणी वाई रस्त्यावर पसरणी घाटात बुवासाहेब मंदिराजवल पालखी रस्त्यावर अवघड वळणावर उतारावर अचानक बसचे ब्रेक फेल झाले.

त्यामुळे चालकाचा ताबा सुटल्यामुळे खाजगी बस क्रमांक (एमएच 14, सीडब्लू 4764) रस्त्यावरच उलटली. वळणावरील असलेल्या चरीत चाक गेल्याने बसला अपघात झाला आहे. चालकाने प्रसंगावधान दाखवल्याने बस डोंगराच्या बाजूला नेली अन्यथा बस दरीत कोसळून मोठी दुर्घटना व जीवितहानी घडली असती.

अपघातात 15 प्रवासी जखमी झाले आहेत. अन्य प्रवाशी किरकोळ जखमी झाले आहेत. जखमींना वाई व पाचगणी येथील रुग्णालयात दाखल केले आहे. घटनेची माहिती मिळताच वाई व पाचगणी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.

Leave A Reply

Your email address will not be published.