सातारा : सातारा जिल्ह्यातील पाचगणी परिसरात मोठी घटना घडली, मात्र सुदैवाने कोणतीही जीवित हानी झाली नाही. वाईहून पाचगणीला परतणारी कार क्रमांक (एमएच- 12 ओटी- 6672) ही पसरणी घाटानजीक आली असता चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने गाडी घाटातील सुरक्षा कठड्यावरील झाडावर जाऊन आदळली.
तब्बल चारशे फूट खोल दरीत कार जाण्यापासून वाचली व त्यातील कारमधील कुटुंबांचे प्राण वाचले.
सातारा जिल्ह्यातील पसरणीचा घाट हा अतिशय धोकादायक आहे. या घाट मार्गावर अनेक छोटे-मोठे अपघात झालेले आहेत. गुरुवारी असाच एक मोठा अपघात होता होता वाचला. त्यामुळे मोठा अनर्थ टळला.
सुदैवाने कारमधील एक पुरुष व दोन महिलांचे प्राण वाचले. काही फूट अंतर जाताच झाडाला अडकल्याने कारमधील सर्वांचे प्राण वाचले.या अपघातात कारचे किरकोळ नुकसान झाले आहे. या अपघाताची नोंद वाई पोलिस ठाण्यात झाली आहे.