पुढच्या वर्षी लाँच होणाऱ्या Hyundai Creta फेसलिफ्टचे डिझाईन व्हायरल

0
नवी दिल्ली : Hyundai Motors पुढील वर्षीच बेस्ट सेलिंग Mid Size SUV Hyundai Creta चे फेसलिफ्ट व्हर्जन लाँच करणार आहे. गेल्या वर्षीच कंपनीने नवीन लूकवाली क्रेटा लाँच केली होती. क्रेटा ही भारतासह जगभरात सर्वाधिक खपाची एसयुव्ही आहे. क्रेटाच्या या नव्या अवताराचे फोटो आणि डिटेल्स पहिल्यांदाच समोर आले आहेत. जे पाहण्यासाठी तुम्ही उत्सूक असाल.
Hyundai Creta ला 2015 मध्ये भारतीय बाजारात उतरविण्यात आले होते. तेव्हापासून ही भारतातील सर्वाधिक खपाची मिड साईज एसयुव्ही बनली. गेल्या वर्षी कंपनीने ह्युंदाई क्रेटाला नवीन अवतारात लाँच केले, तो लूकही खतरनाक आहे. सोबतच यामध्ये अपडेटेड फिचर आहेत. आता पुढच्या वर्षीची फेसलिफ्ट व्हर्जन साऊथ कोरिया मध्ये आधी नंतर चीन आणि भारतात लाँच केली जाणार आहे.
Hyundai Creta फेसलिफ्टला इंडोनेशियाच्या रस्त्यांवर टेस्टिंगवेळी पाहण्यात आले आहे, यामुळे या कारच्या नव्या एक्सटीरिअर डिझाईनबाबत माहिती मिळाली आहे. Creta Facelift च्या सध्याच्या मॉडेलपेक्षा नवे खूप अपग्रेड केलेले आहे. पुढे नवीन ग्रिल, C-Shape हेडलँप, एलईडी डीआरएलसह अन्य अनेक बदल करण्यात आले आहेत. या क्रेटामध्ये इंटीरिअर डिझाईन आणि फिचर्स प्रीमियम असतील. वेगळ्या डिझाईनचा बंपर, नवीन फॉग लँप, सिल्वर कलर फॉक्स स्किड प्लेट, डुअल टोन अलॉय व्हील्स आदी देखील असणार आहेत. इंजिन आणि गिअरबॉक्समध्ये काही बदल असेल असे वाटत नाही.
Leave A Reply

Your email address will not be published.