कोरोनाचा कहर; अमेरिकेत 24 तासात तब्बल 2 लाख नवे रुग्ण

0

वॉशिंग्टन : कोरोनाने पुन्हा हाहाकार माजला आहे. अमेरिका कोरोनापुढे हतबल झाली असून, येथे कोरोनाबाधित रुग्णांची संख्या सर्वाधिक आहे. अमेरिकेतील कोरोनाग्रस्तांच्या संख्येने तब्बल एक कोटीचा टप्पा पार केला आहे. अमेरिकेत एकाच दिवसात कोरोनाचे दोन लाख दहा हजार नवे रुग्ण आढळून आले आहेत. नव्या रुग्णांच्या संख्येने रेकॉर्ड मोडला आहे. तसेच कोरोनामुळे लाखो लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे.

कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. कोरोनावर मात करण्यासाठी बहुतांश देशांत लॉकडाउन करण्यात आला आहे. असे असतानाही कोरोनामुळे मृतांचा आकडा वाढतच आहे.

जॉन्स हॉपकिन्स विद्यापीठाने दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी गेल्या 24 तासांत 2 लाख 10 हजार नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे, तर 2 हजार 907 जणांचा मृत्यू झाला. अमेरिकेत कोरोना रुग्णांची एकूण संख्या ही एक कोटी 40 लाख झाली आहे, तर मृतांची संख्या ही दोन लाखांहून अधिक झाली आहे. अमेरिका, भारत आणि ब्राझील या तीन देशांमध्ये कोरोनाचा सर्वाधिक संसर्ग झाला आहे. येथील रुग्णांची संख्या ही सर्वांत जास्त आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.