एक लाख रुपये घेताना मुख्याध्यापकास अँटीकरप्शन ब्युरोने पकडले ; मागणी करणाऱ्या संस्थेच्या सचिवावर ही गुन्हा

0

सोलापूर : अनुकंपा तत्वावर भरती झालेल्या लिपिकास शिक्षण संस्थेच्या सचिवाने  उर्वरित ५ लाख मागणी केली. त्यापैकी १ लाख रुपये स्वीकारताना मुख्याध्यापकाला लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले.  लाच मागणी करणाऱ्या सचिवा वर ही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

विजयसिंह गणपती पुजारी (५६ वर्षे, रा. जवाहर ग्रामविकास मंडळ, वाळूज ता. मोहोळ जि. सोलापूर असे अटक करण्यात आलेल्या मुख्याध्यापकाचे नाव आहे. तर संस्था सचिव खाजगी इसम शाम उर्फ रोहित जनार्दन कादे, याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

यातील तक्रारदार यांनी त्याचे दिवंगत वडिलांचे जागेवर अनुकंपा तत्त्वावर कनिष्ठ लिपीक या पदावर नोकरी मिळणेकरीता जवाहर ग्रामविकास मंडळ, या संस्थेमध्ये विनंती अर्ज केला होता. परिणामी संस्थेकडून तक्रारदार यांचे विनंती अर्जावर कोणतीही कार्यवाही न झाल्याने  त्यांनी मे. उच्च न्यायालय मुंबई येथे रिट पिटीशन दाखल केली होती या रिट पिटीशन अर्जावर  न्यायालयात तक्रारदार यांचे बाजुने म्हणणे मांडून त्यांना अनुकंपा तत्वावर संस्थेमध्ये नोकरी देण्याकरीता यातील दोन्ही आरोपींनी तक्रारदार यांचेकडे १४ लाख रुपये व सेवेत सामावुन घेतल्यानंतर प्रत्येक वर्षी एक महिन्याचा पगार अशी लाचेची मागणी केली होती.

त्यास अनुसरून तक्रारदार यांनी १४ लाख पैकी ०९ लाख रुपये पहिला हप्ता म्हणुन नोकरीमध्ये रुजु होण्यापूर्वीच यातील आरोपींना समक्ष दिला होता.  त्यानंतर न्यायालयाचे निर्णयानुसार तसेच तक्रारदार यांचे विनंतीनुसार तक्रारदार यांना अनुकंपा तत्वावर नियुक्ती देण्यात आलेनंतर यातील आरोपी मुख्याध्यापक यांनी तक्रारदार यांचेकडे १४ लाख रुपये रक्कमेपैकी उर्वरीत ०५ लाख रुपये संस्थेचे सचिव यांना देण्याकरीता तक्रारदार यांचेकडे तगादा लावुन सदर ०५ लाख रुपये घेवुन भेटण्याकरीता बोलावले होते.

त्यावरून दि. १७/११/२०२१ व १८/११/२०२१ रोजी दोन्ही आरोपीकडे पडताळणी कारवाई करण्यात आली असता पडताळणी कारवाई दरम्यान आरोपी लोकसेवक मुख्याध्यापक यांनी ०५ लाखांपैकी पहिला हप्ता १ लाख घेण्याचे मान्य केले व सापळा कारवाई दरम्यान सदरची लाच रक्कम आरोपी सचिव यांना देण्याकरीता स्विकारली असता मुख्याध्यापकास रंगेहाथ पकडण्यात येऊन त्यांना ताब्यात घेण्यात आले आहे व आरोपी संस्था सचिव यांना ताब्यात घेण्याची कार्यवाही सुरु असून सविस्तर गुन्हा दाखल करण्यात येत आहे.

ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपअधीक्षक संजीव पाटील, पोलीस निरीक्षक उमाकांत महाडीक, पोलीस अमलदार चडचणकर,  पो.ह. सोनवणे, पो.ना. घुगे,
पो.ना. घाडगे, पो.शि. जानराव, पो.शि. पवार, पो.शि. सण्णके, पो.शि. मुल्ला चा.पो.शि. सुरवसे, यांच्या पथकाने केली.

Leave A Reply

Your email address will not be published.