‘तिच्या’साठी आख्खे नगर पेटवून देण्याच्या बाता मारणाऱ्यानेच घेतला जीव

0

अहमदनगर : तिच्यासाठी नगर शहर पेटवून देण्याच्या बाता मारणाऱ्या तरुणानेच अल्पवयीन मुलीला त्रास दिला. यावरून होणारी भांडणे, लग्न व धर्म परिवर्तनासाठी बळजबरी, यास कंटाळून अल्पवयीने युवतीने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली.

पोलिसांनी याप्रकरणी पुणे येथील सोहेल शेख याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी संबंधित युवतीच्या आईने पोलिसांमध्ये तक्रार दिली आहे.

दहावीत शिकणारी मुलगी पुण्याला मामाकडे गेली असता मामाच्या विवाहित मुलीकडे गेली होती व तेथे तिची सोहेलशी ओळख झाली. ओळख जास्तच वाढत गेली.

तिच्याशी लग्न लावून दिले नाही तर आख्खे नगर पेटवून देईल, अशी धमकी त्याने मुलीच्या वडीलांना फोनवरून दिली होती. तसेच मुलीच्या मावस बहिणीच्या लग्नात मावसभावाने काढलेले फोटो सोशल मिडियात टाकल्याने त्यालाही व मुलीलाही त्याने शिवीगाळ केली होती.

तो त्रास देत असल्याची तक्रार या मुलीने कुटुंबातील काही सदस्यांकडे केली होती व या त्रासाला कंटाळून तिने आत्महत्या केल्याची तक्रार तिच्या आईने पोलिसात दिली आहे. तपास पोलीस करत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.