दारू पिण्यात महिला ही पुरुषांच्या बरोबरीने!

वाचा कोणत्या राज्यात कोण पितात सर्वात जास्त दारू

0

नवी दिल्ली : देशात ईशान्याकडील सिक्कीम या राज्यातील महिला देशात सर्वाधिक दारू पितात. तर
बिहार राज्यात पुरुष दारु पिण्यात सर्वात पुढे आहेत. दारु पिण्यात महाराष्ट्र तिसऱ्या स्थानावर आहे. राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षण २०१९-२० चा अहवालात हे स्पष्ट झाले आहे.

सर्वेक्षणानुसार, ईशान्याकडील सिक्कीम या राज्यातील महिला देशात सर्वाधिक दारू पितात. सिक्कीमच्या १६.२ टक्के महिला दारू पितात. तर आसामच्या ७.३ टक्के महिला दारू पितात. हे राज्य दुसऱ्या क्रमांकावर आहे. तेलंगणचे पुरुष दारु पिण्यात टॉपला आहेत, तर तेथील महिला देखील फार मागे नाहीत. या सूचीत त्या तिसऱ्या क्रमांकावर आहेत. सर्वेक्षणानुसार, गोवा आणि तेलंगणला वगळले तर सर्वात जास्त दारूचे सेवन ईशान्येकडील महिला पितात.

दारू पिण्यात महाराष्ट्राचे पुरुष देशात तिसऱ्या स्थानी आहेत. तर, कर्नाटकचे पुरुष सर्वात जास्त दारू पितात. जेथे दारूबंदी आहे अशा गुजरात आणि जम्मू आणि काश्मीर या राज्यांमध्ये पुरुष सर्वात कमी दारू पितात. तथापि, गेल्या सर्वेक्षणाच्या तुलनेत यंदा दारू पिणाऱ्यांच्या संख्येत किती फरक पडला आहे यााबबत माहिती मिळू शकलेली नाही. सन २०१५-१६ च्या सर्वेक्षणात १५ ते ४९ वर्षीय लोकांचा सर्वे करण्यात आला होता. तर नव्या सर्वेक्षणात १५ वर्षांच्या वरील सर्वच लोकांचा समावेश करण्यात आला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.