पुणे : राज्यात कोरोनाने कहर केल्याने शासनाने कडक लॉकडाऊन जाहीर केला आहे. मात्र या लॉकडाऊनचा गैरफायदा घेत कुडजे गावातील फार्म हाऊसवर रंगील पार्टी सुरु होती. यावर उत्तमनगर पोलिसांनी बुधवारी मध्यरात्री छापा टाकून 9 जणांना अटक केली आहे. तर पाच डान्सर मुलींची सुटका करण्यात आलेली आहे.
वरिष्ठ पोलिस अधिकार्यांच्या मार्गदर्शनाखाली उत्तमनगर पोलिस ठाण्याच्या वरिष्ठ पोलिस निरीक्षक वैशाली चांदगुडे आणि त्यांच्या पथकाने फार्म हाऊसवर छापा टाकून ही कारवाई केली आहे. अटक केलेल्या आरोपींमध्ये पुणे महानगरपालिकेतील कॉन्ट्रॅक्टर विवेकानंद विष्णु बडे (42, रा. समर्थनगर, नवी सांगवी, पुणे), मंगेश राजेंद्र शहाणे (32, रा. रामदास सोसायटी, प्लॉट नं. 58, संतनगर, अरण्येश्वर, पुणे), ध्वनीत समीर राजपुत (25, रा. पुरंदर हाऊसिंग सोसायटी, बी/06, पुणे-सातारा रोड, पुणे), निलेश उत्तमराव बोधले (29, रा. पुरंदर हाऊसिंग सोसायटी, ए/903, म्हाडा कॉलनी, पुणे) यांचा समावेश आहे. यांच्यासह पोलिसांनी समीर उर्फ निकेश दिलीप पायगुडे (39, रा. आगळंबे फाटा, कुडजे गाव, ता. हवेली, पुणे), प्राजक्ता मुकुंद जाधव (26, रा. जाधव चाळ, दत्त मंदिर रोड, वाकोला पाईपलाईन, गावदेवी, मिलींद नगर, सांताक्रुझ, पुर्व मुंबई), निखील सुनिल पवार (33, रा. 59/06, पर्वती दर्शन, पुणे), सुजित किरण आंबवले (34, रा. बालाजीनगर, 25/80, सातारा रोड, पुणे) आणि आदित्य संजय मदने (24, रा. निजामुद्दीन चाळ, मोगरा पाडा, अंधेरी पुर्व, मुंबई) यांचा समावेश आहे.
यापैकी मंगेश शहाणे, निखील पवार, ध्वनीत राजपुत, सुजित आंबवले, निलेश बोधले आणि आदित्य मदने यांनी केलेला अपराध हा जामिनकीचा असल्याने त्यांना योग्य तो लायक जामीन देण्यात आल्याने त्यांची जामीनावर मुक्तता करण्यात आली आहे. आरोपी समीर उर्फ निकेश पायगुडे, विवेकानंद विष्णु बडे आणि प्राजक्ता मुकुंद जाधव यांना न्यायालयाने 3 मे पर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. दरम्यान, पोलिसांना पाहिजे असलेला आणि पळून गेलेला आरोपी संदीप चव्हाण (रा. वडगाव बुद्रुक, पुणे) आणि लबडे फार्म हाऊसचे मालक यांच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
उत्तमनगर पोलिसांनी छापा टाकल्यानंतर तिथं 5 डान्सर मुली आढळून आल्या. त्यांची सुटका करण्यात आली आहे. डान्सर मुलींमध्ये 1 मुलगी ही कात्रज परिसरातील असून इतर सर्व जणी या मुंबई, कल्याण आणि ठाणे परिसरातील आहेत. पोलिसांनी ही कारवाई बुधवारी मध्यरात्री केली आहे. लबडे फार्म हाऊसवर बुधवारी रात्री पावणे 11 ते पावणे बारा वाजण्याच्या दरम्यान डीजे लावून मिनी डान्स बार चालु होता.