नवी दिल्ली : मूल दत्तक घ्यायची प्रक्रिया आणखी सुलभ केली जाणार आहे. केंद्र सरकारने ज्युवेनाइल जस्टिस अॅक्ट 2015 च्या नव्या सुधारणेला मंजुरी दिली आहे.
गेल्या काही वर्षांत मूल दत्तक घेण्यासाठी ऑनलाइन अर्ज करणं अनिवार्य करण्यात आलं आहे. तरीही दत्तक घेण्याची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी सहा ते आठ महिन्यांचा कालावधी लागतो. केंद्र सरकारने आता कायद्यात केलेल्या सुधारणेला मान्यता मिळाल्यानंतर ही प्रक्रिया अधिक सोपी होईल.
प्रक्रिया जिल्हा दंडाधिकारी आणि अतिरिक्त जिल्हा दंडाधिकारी आपल्या पातळीवरच पार पाडतील. संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचं दुसरं सत्र आठ मार्चनंतर सुरू होणार आहे. त्या सत्रात केव्हाही हे विधेयक संसदेत मांडलं जाऊ शकतं.
मूल दत्तक घेण्यासाठी अट
– चार वर्षांपर्यंतचं मूल दत्तक घेण्यासाठी दाम्पत्याचं वय 45 वर्षांपेक्षा अधिक असता कामा नये.
– चार ते आठ वर्षांपर्यंतचं मूल 90 ते 100 वर्षांपर्यंतचं दाम्पत्यही दत्तक घेऊ शकतं.
– स्वतःची चार किंवा अधिक मुलं असलेल्या दाम्पत्यांना मूल दत्तक घेता येणार नाही.
– दाम्पत्याला अर्जासोबत उत्पन्नाचं सर्टिफिकेट देणं अनिवार्य आहे.
हे अन् गारठलेल्या 2 दिवसांच्या मुलाला महिला पोलिसाने उराशी कवटाळलं, पुण्यातील घटना
– घटस्फोट झाला असेल, तर घटस्फोटाचं प्रमाणपत्रही देणं आवश्यक
– पती-पत्नीपैकी कोणाचा मृत्यू झाला असेल, तर त्याचं प्रमाणपत्र
– अर्ज करणाऱ्यांच्या आर्थिक स्थितीच्या आधारे कमिटी निर्णय घेते.
– लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या दाम्पत्यांना मूल दत्तक दिलं जात नाही.
– ज्यांना एकही मूल नाही अशा दाम्पत्यांना मूल दत्तक देण्यास प्राधान्य दिलं जातं.
– विवाह न करता एकटे राहत असलेल्या व्यक्तीलाही मूल दत्तक घेता येतं.
– कोणताही संसर्गजन्य किंवा गंभीर रोग नसल्याचं प्रमाणपत्र द्यावं लागतं.
– अर्ज करणाऱ्या दाम्पत्याच्या माहितीची सत्यता पोलीस अधीक्षक कार्यालयाद्वारे तपासली जाते.
– अर्ज करणाऱ्यांच्या घराची पाहणी केली जाते.
– आजूबाजूचं वातावरण, सुविधा आदी बाबींची पाहणी केली जाते.
– मूल दत्तक दिल्यानंतर 10 वर्षांपर्यंत त्या घराचा दौरा करून वेळोवेळी फॉलोअप रिपोर्ट तयार केला जातो.