पिंपरी : महानगरपालिकेच्या शुक्रवारी पार पडलेल्या सर्वसाधारण सभेत नगरसेविका वैशाली घोडेकर म्हणाल्या, सर्वच व्यापारी जी.एस.टी भरतात. तरी सुद्धा व्यापाऱ्यांना कोणत्याच प्रकारच्या योजना सुविधा मिळत नाही. तसेच स्मार्ट सिटीसाठी १०० कोटी रुपये बजेटमध्ये मंजूरी दिली तरी, स्मार्ट सिटी फक्त केबल टाकण्याचे काम करते का?
एमआयडीसी भागात कुठेही सीसीटीव्ही बसवलेले नाहीत, रात्रीच्या वेळी एमआयडीसी भागात चोऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे नागरिक हैराण झाले आहेत. विशेष योजनेसाठी १२०० कोटी रुपये बजेटमध्ये मंजूरी दिली.पण हा विशेष निधी जो तो आपापल्या जोरावर तो पैसा वापणार आहे. शहरी गरिबांसाठी १२०० कोटी रुपये बजेटमध्ये मंजूरी दिली. पण हे पैसे खरचं गरीबांनसाठी खर्च केले जातात का? मागील वर्षी जी.आर.यू. फंड मोठ्या प्रमाणात आला होता.पण त्यातून एकही शहरातील झोपडपट्टी पुनर्वसन केली नाही. त्यामुळे भाजप अपयशी ठरले आहे. गेले चार वर्षात कधीच महापालिका बजेटवर उपसूचना सत्ताधाऱ्यांनी करू दिल्या नाही. अशी खंत देखील व्यक्त केली. |
|
Prev Post