इराकमध्ये श्रीलंकेसारखे अराजक माजले

0

इराक : देशातील राजकीय कोंडी फोडण्यात अपयश आल्यामुळे शिया धर्मगुरू मुक्तदा अल-सद्र यांनी सोमवारी राजकारण सोडण्याची घोषणा केली. या घोषमेनंतर लष्कराने संचारबंदी लागू केली. पण अल-सद्रचे शेकडो समर्थक रस्त्यावर उतरले. त्यांची सुरक्षा जवानांसोबत हिंसक झडप झाली.

सद्रच्या हजारो समर्थकांनी राष्ट्रपती भवनावर (रिपब्लिक पॅलेस) हल्लाबोल केला. सैनिकांनी त्यांना रोखण्यासाठी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या, तसेच गोळीबारही केला. पण ते मागे हटले नाही. या धुमश्चक्रीत 20 जण ठार, तर 300 हून अधिक जण जखमी झाले.

स्थानिक माध्यमांच्या वृत्तानुसार, शिया धर्मगुरू मुक्तदा अल-सद्र यांनी हिंसाचार व शस्त्रास्त्राचा गैरवापर बंद होईपर्यंत आमरण उपोषण करण्याची घोषणा केली आहे.

सद्र यांच्या समर्थकांनी राष्ट्रपती भवनावर ताबा मिळवला. ते स्विमिंग पूल, मिटिंग हॉलसह संपूर्ण पॅलेसमध्ये फिरताना दिसेल. अल-सद्र समर्थक व त्यांचे राजकीय प्रतिस्पर्धी इराण-समर्थित शिया गटात प्रदीर्घकाळापासून वाद सुरू आहे.

धर्मगुरू मुक्तदा अल-सद्र यांच्या पक्षाने गतवर्षी ऑक्टोबरमधील सार्वत्रिक निवडणुकीत सर्वाधिक जागा जिंकल्या. पण त्यांना बहुमत मिळवण्यात अपयश आले. तेव्हापासून इराकमध्ये हा वाद सुरू झाला आहे. त्यांनी समविचारी पक्षांचे सरकार स्थापन करण्यासाठी इराण पुरस्कृत शिया प्रतिस्पर्ध्यांसोबत चर्चा करण्यास नकार दिला होता. तत्पूर्वी, अल-सद्रच्या समर्थकांनी जुलैमध्ये सरकार स्थापनेविरोधात संसदेत निदर्शने केली होती. सलग 4 आठवड्यांपर्यंत धरणे आंदोलन केल्यानतंर त्यांच्या गटाने संसदेचा राजीनामाही दिला होता.

Leave A Reply

Your email address will not be published.