‘भारत बंद’मध्ये हे सुरू राहण्याची शक्यता : राऊत 

0

मुंबई ः महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांनी शेतकरी आंदोलकांनी जाहीर केलेल्या भारत बंदला पाठिंबा दिला आहे. माथाडी कामगारांच्या पाठिंब्यामुळे नवी मुंबई आणि पुण्यातील बाजार समित्याही बंद राहतील, संवेदशनशील भाग एसटी बंद राहील, मुंबईतील रेल्वे, बस, रिक्षा टॅक्सी सुरू राहण्याची शक्यता आहे”, असे शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी सांगितले आहे.

मागील १२ दिवसांपासून पंजाब, हरियाणा, उत्तरप्रदेश आणि इतर राज्यांमध्ये कृषी कायद्याविरोधात शेतकरी आंदोलन करत आहेत. चिवटपणे सुरु असलेल्या आंदोलनात शेतकऱ्यांवर प्रारंभी अश्रुधूर आणि लाठीचार्ज करण्यात आला. त्यानंतर बाॅलिवुडमधूनही मोठ्या प्रमाणात सेलेब्रिटीजनी पाठिंबा दर्शविला. देशभरातील किमान ५०० शेतकरी संघटनांनी हे शेतकरी आंदोलन सुरू ठेवले आहे. दरम्यान, केंद्र सरकारशी ४ वेळा बैठाकाही पार पाडल्या. मात्र, कोणत्याही निष्कर्षापर्यंत ही बैठक पोहोचली नाही.

Leave A Reply

Your email address will not be published.