जुन्या पेंन्शन योजनेसाठी हजारो कर्मचाऱ्यांचा कोल्हापुरात धडक मोर्चा

0

कोल्हापूर : राजस्थान, छत्तीसगड आणि हिमाचल प्रदेशात जुनी पेन्शन योजना लागू करण्यात आली आहे. त्यानंतर आता महाराष्ट्रातील कर्मचाऱ्यांनीही जून्या पेन्शन योजनेच्या मागणीसाठी कोल्हापुरात आंदोलन केले आहे.

राष्ट्रीय पेन्शन योजना (एनपीएस) मोडीत काढून, जुनी पेन्शन सर्वांनाच लागू करण्यात यावी, या मागणीसाठी कोल्हापूरमध्ये गांधी मैदान ते जिल्हाधिकारी कार्यालय असा महामोर्चा काढण्यात आला. या मोर्चाला काँग्रेसचे नेते सतेज पाटील यांचाही उपस्थिती दिसून आली आहे. आमदार सतेज पाटील यांनी येत्या अर्थसंकल्पात जुनी पेन्शन लागू करण्याची मागणी केली.

कर्मचाऱ्यांकडून 14 मार्चपासून जाहीर करण्यात आलेल्या काम बंद आंदोलनाला त्यांनी पाठिंबा दिला. पाटील यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या या मोर्च्यामध्ये हजारो कर्मचाऱ्यांसह त्यांचे कुटुंबीयही या मोर्च्यात सहभागी झाले.

‘एकच मिशन जुनी पेन्शन’ अशा घोषणा देत हे आंदोलन केल जात आहे. सरकारी अधिकारी मंचाचे राज्य संघटक अनिल लवेकर म्हणाले, “राज्य सरकारने 1982 ची जुनी पेन्शन योजना लागू करावी, अशी आमची मागणी आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.