15 हजाराची लाच स्विकारताना तीन ‘फायरमन’ अटकेत

0

अमरावती : रुग्णालयासाठी लागणारी अग्निशामक दलाची परवानगी देण्यासाठी 15 हजार रुपयांची लाच स्वीकारणाऱ्या तीन ‘फायरमन’ला लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली आहे.

फायरमन संतोष सुधाकर केंद्रे (29, पद – फायरमन, अग्निशामक दल, महानगरपालिका अमरावती), गोविंद रामचंद्र घुले (34, पद- , फायरमन, अग्निशामक दल, महानगरपालिका अमरावती), गौरव अशोकराव धंदे (28,फायरमन, अग्निशामक दल, महानगरपालिका अमरावती) या तिघांना अटक केली आहे.

यातील तकारदार हे  कंत्राटदार आहे. त्यांनी इच्छामणी हॉस्पिटल कठोरा नाका अमरावती येथे केलेल्या कामाची एनओसी देण्याकरीता 15 हजार रुपये लाचेची मागणी केली. याबाबत 16 मार्च रोजी लाच लुचपत प्रतिबंधक विभागात तक्रार प्राप्त झाली.

यानुसार सापळा रचण्यात आला. त्यावेळी तक्रारदार यांना N.O.C. देण्याकरिता 15 हजार रुपये लाचेची मागणी करून स्विकारणार असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर 15 हजार रुपये स्विकारताना रंगेहाथ पकडून तिघांना अटक केली. 

पोलीस अधिक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, अमरावती परिक्षेत्र, अमरावतीचे विशाल गायकवाड, अप्पर पोलीस अधीक्षक अरुण सावंत सापळा व तपास अधिकारी पोलीस उपअधीक्षक किशोर म्हसवडे, विनोद कुंजाम, युवराज राठोड व त्यांच्या पथकाने केली.

सर्व नागरीकांना आवाहन
कोणत्याही शासकीय अधिकारी/कर्मचारी यांनी किंवा त्यांच्या वतीने खाजगी इसमाने त्यांचे कोणतेही शासकीय काम करुन देण्यासाठी लाचेची मागणी केल्यास तात्काळ संपर्क साधावा.
लाच लुचपत प्रतिबंधक, अमरावती, अमरावती पोलीस उप अधीक्षक
दुरध्वनी क्रं –  0721- 2552355/ टोल फ्रि क्रं 1064

Leave A Reply

Your email address will not be published.