यंदा तीन महिने कडक उन्हाळा; तापमान वाढले

0
नवी दिल्ली : यंदाच्या वर्षी कडाक्याचा उन्हाळा पडणार असून येत्या 3 महिन्यांचा भयंकर गरमी वाढणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे. मार्च ते मे या काळात दिवसा आणि रात्रीही उष्णता वाढणार आहे.

हवामान खात्याच्या अंदाजानुसार, यंदा जास्तीत जास्त तापमान सामान्यपेक्षा विशेषत: उत्तर पश्चिम भारत म्हणजेच पंजाब, राजस्थान, दिल्ली, महाराष्ट्र, हरियाणा, उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेश व ईशान्य भारतातील काही भाग म्हणजे बिहार, बंगाल, झारखंड इथं अधिक राहील. अशात मध्य प्रदेश, छत्तीसगडच्या काही भागातही हवामान गरम असू शकतं.

गुजरात, सौराष्ट्र, कच्छ, छत्तीसगड आणि ओडिशामध्येही या वेळी जास्तीत जास्त तापमान नेहमीच्या वर जाईल. त्याशिवाय कोकण गोवा आणि आंध्र प्रदेशच्या किनारपट्टी भागातही कमाल तापमान सामान्यपेक्षा जास्त असेल. इतकंच नाहीतर इतर राज्यांत तापमान सामान्य किंवा त्यापेक्षा कमी असेल.

आनंद शर्मा पुढे म्हणाले की, फेब्रुवारी महिन्यातील सरासरी तापमानही सामान्यपेक्षा खूपच जास्त होतं. 2006 नंतर पहिल्यांदाच फेब्रुवारीमध्ये इतकी उष्णता जाणवत आहे. ते म्हणाले की, प्रशांत महासागरात हिवाळ्यात एल निनोचा प्रभाव जास्त असल्यामुळे हिवाळाही जास्त होता.

Leave A Reply

Your email address will not be published.