दिघी, देहूरोड, सांगवी मधून तीन पिस्तूल

0

पिंपरी : पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत दिघी पोलीस, सांगवी पोलीस आणि गुन्हे शाखा युनिट पाचने केलेल्या तीन कारवायांमध्ये दिघी, देहूरोड आणि सांगवी परिसरातून तीन पिस्तूल आणि पाच जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहे.

दिघी पोलिसांनी बोपखेल फाटा चौक येथे कारवाई करून बबलू उर्फ यश मारुती दिसले (वय 20, रा. गणेशनगर, बोपखेल) याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून एक देशी बनावटीचे पिस्टल आणि दोन जिवंत काडतुसे असा 41 हजारांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. याबाबत पोलीस नाईक हेमंत आव्हाड यांनी दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

गुन्हे शाखा युनिट पाचच्या पथकाने शीतळानगर, देहूरोड येथे कारवाई करून आकाश शामराव गोरे (वय 26, रा. पांढरकर चाळ, आकुर्डी) याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून पोलिसांनी एक देशी बनावटीचे पिस्टल आणि एक जिवंत काडतूस असा 25 हजार 200 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. याबाबत पोलीस नाईक गणेश मालुसरे यांनी देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

सांगवी पोलिसांनी पवारनगर, जुनी सांगवी येथून मौलाली रहीम शेख (वय 20, रा. जुनी सांगवी. मूळ रा. कर्नाटक) याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून पोलिसांनी एक देशी बनावटीचे पिस्टल आणि दोन जिवंत काडतुसे जप्त केली. याबाबत पोलीस नाईक शशिकांत देवकांत यांनी देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

तिन्ही कारवायांमध्ये पोलिसांनी 98 हजार 200 रुपयांचा शस्त्रसाठा जप्त केला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.