अमेरिकेच्या संसदेत ट्रम्प समर्थकांची राडेबाजी; एका महिलेचा मृत्यू

0

वाशिंग्टन : अमेरिकेच्या संसदेत डोनाल्ड ट्रम्प समर्थकांनी राडा घातला आहे. त्यामुळे वॉशिंग्टन डीसीमध्ये कर्फ्यू लागू करण्यात आला आहे. कॅपिटलमध्ये झालेल्या या हिंसाचारात एका महिलेचा गोळीबारात मृत्यू झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

नवे राष्ट्राध्यक्ष म्हणून निवडून आलेले जो बायडेन यांनी  ट्रम्प यांना संविधानाची सुरक्षा करण्याचे आवाहन केले आहे. “मी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांना आवाहन करतो की त्यांनी आपली शपथ पूर्ण करण्यासाठी तात्काळ राष्ट्रीय प्रसारमाध्यमावर जावे आणि संविधानाची सुरक्षा करावी आणि हे सर्व थांबवावे”, असे जो बायडेन म्हणाले. याचबरोबर, कॅपिटल बिल्डिंगमध्ये जो गोंधळ आपण पाहिला आहे, ते आम्ही नाही आहोत. ही कायदा न मानणाऱ्या लोकांची खूप कमी संख्या आहे. हा देशद्रोह आहे, असे जो बायडेन यांनी सांगितले.

निवडणुकीच्या निकालाबाबत अमेरिकेच्या संसदेच्या बोलावलेल्या बैठकीपूर्वी ट्रम्प समर्थकांची गर्दी व्हाइट हाऊस आणि अमेरिकन कॅपिटल इमारतीच्या बाहेर जमा झाली आहे. ट्रम्प समर्थकांनी कॅपिटल बिल्डिंगमध्येही गोंधळ केली आहे. यावेळी पोलीस आणि सर्मथकांमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले. रॉयटर्सच्या वृत्तानुसार, वॉशिंग्टन डीसी पोलीस प्रमुखांनी सांगितले की, कॅपिटलमध्ये एक महिलेला गोळी लागल्यामुळे मृत्यू झाला आहे. तर या हिंसाचारात अनेक अधिकारी जखमी झाले आहेत.

डोनाल्ड ट्रम्प यांनी आपल्या समर्थकांना शांततेचे आवाहन केले आहे. आपल्या समर्थकांना शांततेत निषेध करण्याचे आवाहन करीत ट्रम्प म्हणाले की, आंदोलनात कोणतीही हिंसाचार होऊ नये. लक्षात ठेवा आम्ही कायदा व सुव्यवस्थेचा पक्षात आहोत.

#WATCH | I call on President Trump to go on national television now to fulfil his oath and defend the Constitution and demand an end to this siege: US President-Elect Joe Biden on US Capitol mob violence pic.twitter.com/CEaChwBsdd

— ANI (@ANI) January 6, 2021

Leave A Reply

Your email address will not be published.