बारावीचा निकाल ! यंदाही कोकण विभागाचा डंका

0

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून बारावी बोर्डाच्या निकालाची उत्सुकता विद्यार्थी आणि पालकांना होती. त्याला आज पूर्णविराम मिळाला आहे. आज बारावीचा यंदाच्या वर्षीचा निकाल जारी करण्यात आला आहे. राज्यातील निकालापैकी कोकण विभागाने बाजी मारली आहे.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने इयत्ता 12 वीचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. बारावीच्या नियमित विद्यार्थ्यांचा एकूण निकाल 94.22 टक्के इतका लागला असून मुंबई विभागाचा निकाल सर्वात कमी लागला आहे. आज दुपारी एक वाजता विद्यार्थ्यांना ऑनलाईन निकाल पाहता येणार आहे.

राज्य शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत हा निकाल जाहीर करण्यात आला. शिक्षण मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी राज्यातील बारावीच्या निकालाची आकडेवारी जाहीर केली आहे. दरम्यान, कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर 10 वी आणि 12 वी बोर्डाच्या परीक्षी ऑफलाईन पद्धतीने घेण्यात आल्या होत्या. बरेच चढउतार असतानाही विद्यार्थ्यांनी परीक्षेचा हा टप्पा मोठ्या संयमानं ओलांडला याबाबत शिक्षण मंडळानं विद्यार्थ्यांचं अभिनंदन केलं आहे.

विभागवार निकाल पाहा –

– कोकण विभाग – 97.21 टक्के

– नागपूर – 96.52 टक्के

– अमरावती – 96.34 टक्के

= लातूर – 95.25 टक्के

– कोल्हापूर – 95.07 टक्के

– नाशिक – 95.03 टक्के

– औरंगाबाद – 94.97 टक्के

– पुणे – 93.61 टक्के

– मुंबई – 90.91 टक्के

पुढील संकेतस्थळांवर बारावीचा ऑनलाइन निकाल पाहता येणार –

www.mahresult.nic.in

www.hscresult.mkcl.org

http://hsc.mahresults.org.in

Leave A Reply

Your email address will not be published.