राज्यावर आणखी दोन दिवस पावसाचे सावट

0

मुंबई : कोकण आणि मध्य महाराष्ट्रासाठी तीन दिवस हवामान विभागाने मुसळधार पावसाचा अलर्ट जारी केला आहे. तर संपूर्ण महाराष्ट्रासाठी हवामान विभागाकडून 22 ते 26 जुलैपर्यंत गंभीर हवामानाचा इशारा देण्यात आला आहे.

अनेक जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा फटका बसला आहे. राज्यातील काही भागांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली असून नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे. जनजीवन विस्कळीत झाले आहे. मुसळधार पावसामुळे कोल्हापूर आणि रत्नागिरी जिल्ह्यात बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे. एनडीआरएफची पथके मदतकार्यासाठी तैनात करण्यात आली आहेत. कोल्हापूरतील पंचगंगा नदी कोणत्याही क्षणी धोक्याची पातळी ओलांडण्याची परिस्थिती आहे. कोल्हापूर शहर आणि ग्रामीण भाग येथे संपर्क साधणे कठीण झाले आहे.

तसेच रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूणमध्ये घरे, बाजारपेठा येथे पाणी शिरल्यामुळे रेस्क्यू बोटींच्या मदतीने मदतकार्य सुरू आहे. रायगड आणि ठाणे जिल्ह्यातही पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. महाडमध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे. मुंबई गोवा महामार्गावरची वाहतूक विस्कळीत झाली आहे. रत्नागिरी ते सोमेश्वर – लोणदे – चिचखरीला जाणारा मार्ग बंद आहे. खेड, चिपळूण, रत्नागिरी, लांजा आणि राजापूरला पुरस्थिती गंभीर आहे.

Severe weather warnings issued by IMD for Maharashtra for 22-26 Jul.
Next 2,3 days Konkan Madhya Mah alerts issued. Pl see IMD updates regularly. pic.twitter.com/gPREiKcXjQ

— K S Hosalikar (@Hosalikar_KS) July 22, 2021

Leave A Reply

Your email address will not be published.