अमेरिकन वायूसेनेच्या दोन विमानांची हवेतच धडक

0

अमेरिका : अमेरिकेतील डलास एक एयर शोच्या दरम्यान अमेरिकन वायूसेनेच्या दोन विमानांची हवेतच धडक होऊन भीषण अपघात झाला. धडक झाल्याने दोन्ही विमान लगेचच जमिनीवर पडले आणि स्फोट होऊन त्यांचे तुकडे-तुकडे झाले.

यूएस फेडर एविएशन अॅडमिनिस्ट्रेशनच्या हवाल्याने याचे वृत्त देण्यात आले आहे. दरम्यान दोन्ही विमानांच्या वैमानिकांची स्थितीबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अमेरिकन वायुसेनेच्या स्मारक विंग्सच्या डलास येथे आयोजित एअर शो दरम्यान ही दुर्घटना घडली. एफएए आणि राष्ट्रीय परिवहन सुरक्षा बोर्डने या घटनेची चौकशी सुरू केली आहे.

शो मध्ये सहभागी लोकांद्वारे हा व्हिडिओ कॅप्चर करण्यात आला. हा व्हिडिओ व्हायरल झाला आहे आणि तो अधिकाधिक सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शेअर केला जात आहे. या व्हिडिओत एका मोठे विमान सरळ रेषेत उडत आहे. ते जमिनीपासून खूप उंचावर नाही. असे दिसते. त्याच वेळी एक छोटे विमान आपली दिशा बदलून डाव्या बाजूने येते आणि ते सरळसरल या मोठ्या विमानावर आदळून त्याचे तुकडे-तुकडे होतात. त्यामुळे मोठे विमान खाली जमिनीवर येऊन स्फोट होऊन त्याचेही तुकडे तुकडे होतात,

व्हि़डिओत दिसणारे मोठे विमान हे अमेरिकेचे बी-17 सीरिजमधील बॉम्बवर्षाव करणारे विमान आहे. याने दुस-या महायुद्धात जर्मनी विरोधात मोठी कामगिरी केली होती. हे चार इंजिन असलेले विमान होते. तसेच आतापर्यंत बॉम्ब वर्षाव करणा-या सर्वाधिकव विमानांपैकी ते एक आहे. तर छोटे विमान हे पी-63 किंगकोबरा बेल एअरक्राफ्ट हे देखिल दुस-या महायुद्धा दरम्यान विकसित केलेले लढाऊ विमान होते. या विमानाचा वापर दुस-या महायुद्धात सोवियत वायु सेनाने देखिल केला होता.

यापूर्वी बी 17 सोबत शेवटची दुर्घटना 2 ऑक्टोबर 2019 मध्ये झाली होती. कनेक्टिकटच्या विंडसर लॉक्समधील विमानतळावर ती दुर्घटना झाली होती. ज्यामध्ये सात लोकांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर बी-17 सोबत आत्ता ही दुर्घटना झाली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.