‘…अन् उद्धव ठाकरे शिवसेनेची सोनिया सेना करण्यास गेले’

0

मुंबई : विधान परिषदेच्या निकालानंतर एकनाथ शिंदे यांनी बंडाचे निशाण फडकवले आणि राज्यात राजकीय वातावरण चांगलेच पेटलं. त्यात उद्धव ठाकरे यांनी बंडखोर आमदारांना आवाहन करत समोर या, चर्चा करा, मी जर मुख्यमंत्री नको तर सांगा, मी राजीनामा देतो, असं उद्धव ठाकरे यांनी सांगितले. उद्धव ठाकरेंच्या भावनिक आवाहनाला एकनाथ शिंदे यांनी इमोशनल उत्तर दिलं. त्यानंतर भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी उद्धव ठाकरे यांना टोला लगावला आहे. ‘जनतेला भेटत नाही, आमदारांना वेळ देत नाही ते आता समोर चर्चेला या म्हणतायेत’ अशा शब्दांत सुधीर मुनगंटीवार यांनी टोला लगावला.

सुधीर मुनगंटीवार म्हणाले, ही अनैसर्गिक आघाडी आहे हे खरे आहे. खुर्चीचे प्रेम जागे झाले आणि उद्धव ठाकरे शिवसेनेचे सोनिया सेना करण्यास गेले. या ढोंगी सरकारला जागा दाखवणे गरजेचं होते. तुम्ही जनतेसमोर गेला नाही. मंत्रालयात मुख्यमंत्री जातात अशी बातमी होते. त्याला जनतेचे प्रेम म्हणायचं? व्हिडीओ संवाद जनतेशी करता मग आमदारांशी करा. त्यांनी समोर यावं हे सांगणे म्हणजे आश्चर्य आहे. मुख्यमंत्र्यांची ऑफर नाकारलीच पाहिजे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे जनतेला भेटत नाहीत, मंत्रालयात जात नाही. आमदारांना भेटत नाही. फोनवरून संवाद साधता मग त्यांना प्रत्यक्षात भेटायला बोलावता तुम्ही, फोनवर बोलू शकता असं ते म्हणाले.

एकनाथ शिंदे जे बोलले खरेच आहे.
मी वाट चुकलो होतो. अडीच वर्ष मी हिंदुत्वाची बाजू घेतली नाही हे तुम्हाला घोषित करावं लागेल. हिंदुत्वाची बाजू घेत आहेत मग MIM तुमचं कौतुक कसं करतंय? शब्दात हिंदुत्व पण कृतीत नाही. लतुम्ही काँग्रेसला कसे भटला. जयपूरला काँग्रेसचे आमदार गेले. सोनिया गांधी यांच्यासमोर झुकलेला फोटा जनतेने पाहिला. आम्ही 95 मध्ये युती सरकार असताना स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत भाजप आमदार गेलो होतो. तेव्हा एकवीरा मातेसमोर जात काँग्रेससोबत कधी जाणार नाही अशी शपथ घेतली होती. मग शिंदे यांनी हिंदुत्वाची बाजू घतेली ती चुकीची कशी? तुम्ही त्यांची बाजू घ्यायला हवी. ज्यांनी त्रास दिला त्यांच्याबद्दल हर्ष व्यक्त करतात असा टोला सुधीर मुनगंटीवार यांनी लगावला.

Leave A Reply

Your email address will not be published.