मुंबई : आपण यापूर्वी नो पार्किंग झोन, सायलेंट झोन यासारखे झोनची नावे ऐकली असतील, मात्र सध्या मुंबईत एका नवीन झोनची जोरदार चर्चा आहे. मुंबईच्या बोरवली परिसरात लागलेल्या पाट्या काहीशा वेगळ्या आहेत.
त्या पाट्या वाचून भल्याभल्यांच्या भुवया उंचावतील. बोरवलीच्या जॉगर्स पार्कमध्ये लोक फेरफटका मारण्यासाठी येत असतात. मात्र, हे इथं लिहलंय “NO KISSING ZONE” या जॉगर्स पार्कमध्ये अनेक कपल्स येत असतात. त्यांचे किसिंग पाहून इथल्या आसपासच्या सोसायटीतले लोक कंटाळले आहेत. त्यामुळे कंटाळलेल्या सोसायटीवाल्यांनी रस्त्यावरच ‘नो किसिंग झोन’ असं लिहिलंय.
जॉगर्स पार्क परिसर बोरवलीचा हाय प्रोफाईल परिसर आहे. याच हाय प्रोफाईल जागेमध्ये एक गार्डन बनवलं आहे. या गार्डनमध्ये रोज कपल्स येत असतात. आडोसा पाहून कुठेतरी बसत असतात. कुठल्यातरी कोपऱ्यात उभे राहतात आणि किसिंग करतात. यामुळे आसपास राहणाऱ्या इमारतीमधील महिला आणि वृद्ध व्यक्ती मात्र रोज हे पाहून हैराण झाले. त्यामुळेच ‘नो किसिंग झोन’ अशी पाटीच लागल्याने किसवाल्यांचीं अडचण करून ठेवली आहे.