5 लाखांची लाच स्वीकारताना विद्यापीठाचा कुलगुरू अटकेत

0

जयपूर : पाच लाखांची लाच स्वीकारताना राजस्थान टेक्निकल विद्यापीठाचा कुलगुरू लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात सापडला आहे. ही कारवाई राजस्थानमध्ये भ्रष्टाचार विरोधी पथकाने केली. राजस्थान युनिव्हर्सिटीच्या गेस्टहाऊसमध्ये ही कारवाई करण्यात आली. कुलगुरुंना पथकाने रंगेहाथ पकडून अटक केली आहे. डॉ. रामअवतार गुप्ता असं कुलगुरूचे नाव आहे. या घटनेमुळे विद्यापीठात खळबळ उडाली आहे.

इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये जागा वाढवण्याच्या मागणीसाठी 21 लाख रुपये मागितले होते. विशेष म्हणजे ते यूपीएससी आणि राजस्थान लोकसेवा आयोगाच्या सिलेक्शन कमिटीचे सदस्यही राहिलेले आहेत. दरम्यान, तक्रारीच्या आधारे राजस्थान टेक्निकल यूनिव्हर्सिटीचे कुलगुरू गुप्ता एका खासगी इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये सीट वाढविण्यासाठी लाच मागत असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर सापळा रचला आणि रामअवतार गुप्ता यांना 5 लाखांची लाच स्वीकारताना सरकारी गेस्ट हाऊसमधून रंगेहात अटक केली असल्याची माहिती एसीबी पथकाने दिली.

लाचेच्या रकमे सोबतच सरकारी गेस्ट हाऊसच्या झडतीत जवळपास 21 लाख रुपये रोकड सापडले आहेत. गुप्ता यांच्या निवासस्थानी केलेल्या तपासात 3 लाख 64 हजार रुपये रोकड, 458 ग्रॅम सोनं, 6.69 किलो चांदी सापडले. तसेच, रामअवतार आणि त्यांच्या पत्नीच्या नावावर एकूण 18 बँकांमधील विविध खात्यांत मिळून 68 लाख 72 हजार रुपये रोकड मिळाली. त्यांचा मुलगा, मुलगी आणि सुनेच्या 7 बँक खात्यांत 10 लाख 84 हजार रुपये सापडले आहेत. रामअवतार यांची उर्वरित मालमत्ताचे कागदपत्रे सापडले आहेत.

दरम्यान, एसीबीचे अतिरिक्त महानिर्देशक दिनेश एम. एन. के. यांच्या अंतर्गत आरोपीच्या निवासस्थानी आणि इतर ठिकाणी छापेमारी करण्यात येत आहे.
याप्रकरणी भ्रष्टाचार निवारण अधिनियम अंतर्गत गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून त्यानुसार पुढील कारवाई केली जाईल. असं सांगितलं आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.