मुंबई : राज्यात विदर्भ तापला असून रविवारी (दि.१४) तेथील ९ शहरांत पारा चाळिशीपार होता. अकोल्यात सर्वाधिक ४५.५ अंश सेल्सिअस तापमान नोंदविण्यात आले. राज्यातही १७ शहरांतील पारा चाळिशीपार होता. नाशकात तापमानात घसरण झाली असून येथे ३६.३ तापमान नोंदवले गेले. दरम्यान, आगामी पाच दिवस कमाल तापमान हे सरासरी इतके राहणार असल्याचा अंदाज हवामान तज्ञ माणिकराव खुळे यांनी वर्तवला आहे. राज्यातील काही भागांत गेल्या पाच दिवसांपासून उष्णतेची तीव्रता वाढली आहे.
अकोला ४५.५, अमरावती ४५.४, वर्धा ४४.९, नागपूर ४४.३, यवतमाळ ४३.५, चंद्रपूर ४३.२, जळगाव ४३.२, बीड ४२.७, नांदेड ४२.६, गोंदिया ४२.५, ब्रम्हपुरी ४२.०, गडचिरोली ४१.८, परभणी ४१.४, नगर ४१.४, सोलापूर ४१.१, छत्रपती संभाजीनगर ४१.०, बुलडाणा ४०.८, पुणे ३७.५, सांगली ३७.४, नाशिक ३६.३, मुंबई ३४.८.
दक्षिण हरियाणामध्ये समुद्र सपाटीपासून ९०० मीटर उंचीवर चक्राकार वारे वाहत आहेत तर पूर्व उत्तर प्रदेशातील चक्राकार वाऱ्यांची स्थिती निवळली आहे. आज (ता. १५) राज्यात कमाल तापमानातील चढ-उतार होण्याबरोबरच, दमट आणि उष्ण हवामान अधिक त्रासदायक ठरण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.