सातारा : सातारच्या राजकारणात राष्ट्रवादीचे आमदार शशिकांत शिंदे आणि भाजप आमदार शिवेंद्रराजे भोसले यांच्यात जोरदार संघर्ष सुरू आहे. शिवेंद्रराजेंनी थेट शशिकांत शिंदेंना सज्जड दम भरलाय आहे.
शशिकांत शिंदे यांनी जावळी तालुक्यात निवडणुकीच्या निमित्ताने रान पेटवलं, तर तुम्हाला थंड करुन घरी बसवायची ताकद आमच्यात आहे. असा इशारा शिवेंद्रराजे भोसलेंनी शशिकांत शिंदेंना दिला आहे.
सातारा जिल्ह्यात आमदार शशिकांत शिंदे आणि आमदार शिवेंद्रराजे भोसले यांचे आरोप-प्रत्यारोप काही थांबायचं नाव घेताना दिसत नाहीयेत. राष्ट्रवादीचे आमदार शशिकांत शिंदे यांनी शिवेंद्रराजेंना अध्यक्ष होण्यासाठी माझी शिफारस कमी पडली अशी बोचरी टिला केली होती. या टिकेला भाजपाचे आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी उत्तर दिलंय. शशिकांत शिंदे यांनी माझ्यासाठी कधीच शिफारस केली नसून मी सुरुवातीला चेअरमन झालो, त्या बैठकीत सुद्धा शशिकांत शिंदे यांनी माझ्या ५ वर्षांच्या चेअरमनपदाला विरोध दर्शविला होता. असं शिवेंद्रराजे म्हणाले आहेत.
शशिकांत शिंदे हे धादांत खोट बोलत आहेत. असे सांगून आमदार शशिकांत शिंदे यांनी जावळी तालुक्यात निवडणुकीच्या निमित्ताने रान पेटवलं, तर तुम्हाला थंड करुन घरी बसवायची ताकद आमच्यात आहे. असा इशारा शिवेंद्रराजे भोसलेंनी शशिकांत शिंदेंना दिलाय. त्यामुळे सातारचं राजकारण पुन्हा एकदा तापलंय. गेल्या अनेक वर्षांपासून सातारच्या राजकारणावरून शशिकांत शिंदे विरुद्ध राजे हा सघर्ष सुरू आहे.